PHOTO | ‘ब्युटी इन ब्लॅक’, उर्मिला कोठारेच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहतेही फिदा!

उर्मिला तिच्या दुसऱ्या वेब सीरीजमधून अर्थात ‘SIX’ या सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरीजच्या प्रमोशन दरम्यान उर्मिला कोठारेने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये उर्मिला खूप सुंदर दिसत आहे.

1/6
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट असते.
2/6
'दुनियादारी', 'शुभ मंगलम सावधान', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमधून उर्मिलानं मराठी चित्रपटसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
3/6
मागील काही काळापासून ब्रेकवर असणाऱ्या उर्मिलाने आता जोरदार ‘कमबॅक’ केला आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या उर्मिला कोठारेने ‘ब्रीथ’ या वेब सीरीजमधून डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे.
4/6
आता उर्मिला तिच्या दुसऱ्या वेब सीरीजमधून अर्थात ‘SIX’ या सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
5/6
या वेब सीरीजच्या प्रमोशन दरम्यान उर्मिला कोठारेने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये उर्मिला खूप सुंदर दिसत आहे.
6/6
उर्मिला ‘SIX’ या वेब सीरीजमध्ये ‘नूर बेग’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. उर्मिलाच्या या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते देखील फिदा झाले आहे. नेटकरी या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत.