AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pamela Chopra | राणी मुखर्जीच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; सासू पामेला चोप्रा यांचं निधन

राणी मुखर्जीची सासू आणि दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचा निधन झालंय. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला या पाश्वगायिका होत्या. इतकंच नव्हे तर त्या लेखिका आणि निर्मातीसुद्धा होत्या.

Pamela Chopra | राणी मुखर्जीच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; सासू पामेला चोप्रा यांचं निधन
Yash Chopra's wife Pamela ChopraImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 20, 2023 | 4:34 PM
Share

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राणी मुखर्जीची सासू आणि दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचा निधन झालंय. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला या पाश्वगायिका होत्या. इतकंच नव्हे तर त्या लेखिका आणि निर्मातीसुद्धा होत्या. पामेला यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पामेला या आदित्य आणि उदय चोप्रा यांच्या आई होत्या. जवळपास 11 वर्षांपूर्वी पामेला यांचे पती यश चोप्रा यांचं निधन झालं होतं.

लिलावती रुग्णालयात होत्या दाखल

पामेला यांना 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडली. यशराज फिल्म्सच्या ‘द रोमँटिक्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये पामेला शेवटच्या झळकल्या होत्या. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्या पती यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. ‘द रोमँटिक्स’मध्ये यश चोप्रा यांच्या इंडस्ट्रीतील योगदानासोबतच पामेला यांच्या कामावरही प्रकाश टाकण्यात आला होता. निर्माते म्हणून आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यश चोप्रा यांची परिस्थिती काय होती, याविषयीही त्यांनी सांगितलं होतं. चित्रपटातील काही गोष्टींच्या बाबतीत महिलांचा दृष्टीकोण जाणून घेण्यासाठी ते नेहमी पामेलाची मदत घ्यायचे, असंही त्यांनी सांगितलं.

1970 मध्ये यश चोप्रा यांच्याशी केलं लग्न

पामेला यांनी 1970 मध्ये यश चोप्रा यांच्याशी लग्न केलं. या दोघांचं अरेंज मॅरेज होतं. यश आणि पामेला चोप्रा यांना आदित्य आणि उदय ही दोन मुलं आहेत. आदित्य हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याने अभिनेत्री राणी मुखर्जीशी लग्न केलं. तर उदय हा अभिनेता आणि निर्माता आहे.

‘दिल तो पागल है’ची पटकथा लिहिली

1976 मधील ‘कभी कभी’पासून ते 2002 मधील ‘मुझसे शादी करोगी’पर्यंत असंख्य गाणी पामेला चोप्रा यांनी गायली आहेत. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आईना’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. त्याचसोबत त्यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि लेखिका तनुजा चंद्रा यांच्यासोबत 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटातील एका सीनमध्येसुद्धा त्या झळकल्या होत्या. ‘एक दुजे के वास्ते’ या गाण्याच्या ओपनिंग सीनमध्ये पामेला पतीसोबत दिसल्या होत्या.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.