New Song : यशोमानचा रोमँटिक अंदाज, ‘तू इथे जवळी राहा’ गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला!

अनेक नवनवीन टीव्ही मालिकांमधून चमकलेला आणि तरुणांचा आवडता अभिनेता यशोमान आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र झळकणार आहेत. (Yashoman Apte's Romantic Song)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:52 PM, 25 Feb 2021
New Song : यशोमानचा रोमँटिक अंदाज, 'तू इथे जवळी राहा' गाणं लवकरच  रसिकांच्या भेटीला!

मुंबई : अनेक नवनवीन टीव्ही मालिकांमधून चमकलेला आणि तरुणांचा आवडता अभिनेता यशोमान आपटे (Yashoman Apte)आणि ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र झळकणार आहेत. ‘नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा’ असे शब्द आणि बोल असलेला हा म्युझिक व्हिडीओ येत्या 27 फेब्रुवारीला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे. (Yashoman Apte’s new song)

सप्तसूर म्युझिक-फिल्मी आऊल स्टुडिओ निर्मित

सप्तसूर म्युझिक-फिल्मी आऊल स्टुडिओ या म्युझिक व्हिडीओचे  प्रस्तुतकर्ते आणि साईनाथ राजाध्यक्ष निर्माते आहेत. कृतिक मझीर यांनी या व्हिडीओचं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी केली आहे. तसेच व्हिडीओमध्ये अनिरुद्ध बांदिवडेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं चार्वाक माधुरी यांनी केलं आहे,  तर आदित्य नीला यांनी गाणं गायलं आहे.

Yoshoman

फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

तर अशी ही यंग आणि फ्रेश जोडी, उत्तम संगीत आणि गीत, नेत्रसुखद छायांकन या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सप्तसूर म्युझिकच्या या पूर्वीच्या म्युझिक व्हिडीओंनाही लाखो व्ह्यूजच्या रुपानं उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ‘तू इथे जवळी रहा हा’ म्युझित व्हिडीओसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळवेल यात शंका नाही.एवढंच नाही तर यशोमानचे चाहतेसुद्धा त्याच्या या गाण्याची आतुर्तेनं वाट पाहत आहेत. हा व्हिडीओ म्हणजे मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

संबंधित बातम्या

गंगूबाईचा रोल आलियाच्या नशिबी नव्हता, भन्साळींची पहिली पसंती होती ‘या’ हिरॉईनला

Hardeek  Joshi | कुस्तीचा आखाडाच नव्हे, ‘राणा दा’ आता कोल्हापूरची ‘खाऊ गल्ली’ गाजवणार!