Year Ender 2025 : पिक्चरपेक्षा वादाचीच चर्चा, 2025 मध्ये या चित्रपटांवरून झाला गदारोळ
या वर्षी अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित झाले. काही ब्लॉकबस्टर ठरले, तर काही पिक्चर वादग्रस्त ठरले, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला. 2025 मध्ये कोणकोणत्या चित्रपटांवरून झाला वाद, घेऊया जाणऊन

2025 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांत संपणार आहे. नेहमीप्रमाणे, या वर्षीही अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान (Box Office Collection) कमाई केली आणि बॉलिवूडला पुनरुज्जीवन मिळालं. मात्र काही चित्रपट असेही होते, जे प्रचंड वादात सापडले. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यावरून वाद होतच राहिला. या लिस्टमधला तर एक चित्रपट (Movies) असा आहे की सगळ्या वादानंतरही त्याने प्रचंड कमाई केली असून अजूनही तो चर्चेत आहे. तथापि, काही चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकले. यावर्षीचे सर्वात विवादीत चित्रट कोणते, चला टाकूया नजर..
1) इमर्जन्सी (Emergency)
कंगना राणौत दिग्दर्शित “इमर्जन्सी” हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1975 मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या ऐतिहासिक घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटामुळे बराच वाद निर्माण झाला. चित्रपटाचे प्रदर्शन अनेक दिवस लांबणीवर पडले. शीख संघटनांनी असा आरोप केला की, या चित्रपटात त्यांच्या समुदायाचे नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे आणि ऐतिहासिक तथ्ये विकृत करण्यात आली आहेत. त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली होती.
2) छावा (Chhaava)
विकी कौशल यांचा ऐतिहासिक ‘छावा’ हा चित्रपट फेब्रुवारीत रिलीज झाला. तो लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरला, आणि बॉक्स ऑफीसवरही दणदणीत कमाई केली. मात्र हाँ चित्रपटही वादाच्या गर्तेत सापडला, अनेक राज्यांत त्यावरून वाद झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही नृत्य दृश्यं आणि काही ऐतिहासिक व्यक्तींच्या चित्रणावर महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आक्षेप घेतला होता. व्यापक विरोधानंतर, निर्मात्यांनी काही दृश्यांमध्ये बदल केले. याच चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दाही जोर धरू लागला होता.
3) उदयपुर फाइल्स (Udaipur Files)
राजस्थानमधील कन्हैयालाल खून प्रकरणावर आधारित हा चित्रपट 8 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मूळतः जुलैमध्ये रिलीज डेट होती, पण सेन्सॉरशिप प्रक्रियेमुळे तो रखडला होता. या चित्रपटावर जातीय द्वेष भडकवण्याचा आणि एका विशिष्ट समुदायाचे नकारात्मक चित्रण करण्याचा आरोप होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली. सेन्सॉर बोर्डाने 50 हून अधिक कट लावल्यानंतर अखेर चित्रपट प्रदर्शित होण्यास परवानगी देण्यात आली.
4) फुले (Phule)
25 एप्रिल 2025 रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बायोपिकमध्ये प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. पण हा चित्रपटही वादात सापडला. काही ब्राह्मण संघटनांनी चित्रपटात त्यांच्या समुदायाचे नकारात्मक चित्रण केल्याचा आरोप केला. हा वाद इतका वाढला की चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आणि सेन्सॉर बोर्डाने हस्तक्षेप केल्यानंतरच त्याला हिरवा कंदील मिळाला. या चित्रपटाच्या वादात राजकीय पक्षही अडकले.
5) द बंगाल फाइल्स (The Bengal Files)
विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने मार्केटमध्ये आधीच बरीच चर्चा निर्माण केली होती. त्यामुळे खूप वादही निर्माण झाला होता. 1946 च्या हिंसाचारावर आणि “हिंदू नरसंहार” च्या दाव्यांवर आधारित या चित्रपटावर राजकीय प्रचार म्हणून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. प्रदर्शनामुळे व्यापक तणाव आणि निदर्शनेही करण्यात आली होती.
6) अबीर गुलाल (Abir Gulaal)
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांचा ह चित्रपट भारतात रिलीज होऊ शकला नाही. एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात प्रचंड संताप दिसला. त्यामुळे या चित्रपटालाही खूप विरोध झाला अखेर हा चित्रपट परदेशात रिलीज करण्यात आला. पण भारतात त्यावर पूर्णपणे बंदी होती.
7) द ताज स्टोरी (The Taj Story)
31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या परेश रावल यांच्या “द ताज स्टोरी” या चित्रपटालाही वादाचा सामना करावा लागला. या चित्रपटात ताजमहालबद्दल खोटे दावे केल्याचा आरोप करण्यात आला होता. ताजमहालच्या आत शिवमंदिराच्या अस्तित्वासारख्या दाव्यांमुळेही बराच वाद निर्माण झाला. हा चित्रपट जातीय वातावरण बिघडू शकतो, न्यायालयात याचिकाकर्त्यांनी आरोप केला.
8) ‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड’ (The Bads of Bollywood)
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची वेब सिरीजही या वर्षी चर्चेत आली. “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” (The Bads of Bollywood) चा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आरोप केला की ही वेबसीरिज त्यांची प्रतिमा मलिन करू शकते. तसेच रणबीर कपूरच्या एका सीनमुळेही बराच वाद झाला होता.
9) धुरंधर (Dhurandhar)
5 डिसेंबर 2025 ला रिलीज झालेल्या धुरंधरने तूफान कमाई केली असून सगळेच अवाक् झालेत. विशेष म्हणजे हाँ चित्रपट रिलीज झाल्यावर बरेच विवाद झाले. हा चित्रपट सध्याच्या सरकारच्या राजकीय अजेंडाला चालना देणारा असल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय, हा चित्रपट शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात होते, परंतु निर्मात्यांनी आमची परवानगी घेतली नव्हती असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी असा दावा केला. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं. तसेच पाकिस्तानचे नकारात्मक चित्रण करण्यात आल्याने हा चित्रपट आखाती देशांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही.
