Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत, ‘बिग बॉस 18’मध्ये दिसणार चहल, पहिला फोटो समोर

अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटपटून युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच तो 'बिग बॉस' च्या सेटवर दिसला होता.

Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत, 'बिग बॉस 18'मध्ये दिसणार चहल, पहिला फोटो समोर
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 9:14 AM

Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटपटू, लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीच आलेबल नाही, ते लवकरच वेगळे होणार, अशा अनेक चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, या जोडप्याने या अफवांवर अद्याप थेटपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही, पण सोशलल मिडीयावरील त्यांच्या क्रिप्टीक पोस्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचदरम्यान आता तहलबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तो लवकरच ‘बिग बॉस 18’ या सलमान खानच्या रिॲलिटी शो मध्ये दिसणार आहे. नुकातच तो या शोच्या सेटवर दिसला होता, ज्याचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.

युझवेंद्र चहल ‘बिग बॉस 18’ च्या सेटवर कॅज्युअल लूकमध्ये दिसला होता. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची लूज डेनिम पॅन्टमध्ये तो एकदम मस्त दिसत होता. चहलने पिवळ्या रंगाच्या स्नीकर्सने त्याचा लूक पूर्ण केला. यावेळी त्याच्या हातात बॅकपॅकही दिसली. त्याच्या कारमधून उतरून तो थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेला. समोर आलेल्या फोटग्राफर्सना त्याने काहीही पोझ वगैरे दिली नाही.

श्रेयस अय्यर आणि शशांक सिंह यांच्यासह दिली पोझ

नंतर तयार झाल्यावर युजवेंद्र चहल आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आला. यावेळी त्याच्यासोबत श्रेयस अय्यर आणि शशांक सिंगही दिसले. युझवेंद्रने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गोसोबत पांढरे जॅकेट घातले होते. तो त्याच्या मित्रांसोबत पापाराझींसाठी पोज देतानाही दिसला.

घटस्फोटांच्या अफवांदरम्यान काय म्हणाला चहल ?

रिपोर्ट्सनुसार, चहल आणि धनश्री वर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यानंतरच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. त्याचबरोबर धनश्री आणि युजवेंद्रच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्याही समोर येत आहेत. या अफवांवर या जोडप्याने कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु अलीकडेच युझवेंद्र चहलने एक पोस्ट केली होती. युझवेंद्र चहलने घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अनेक पोस्ट केल्या. मात्र चहलने या इंस्टा स्टोरीतून दोघांच्या नात्याबाबत इशारा दिला आहे. चहलने या स्टोरीतून स्वत:ला चांगला खेळाडू, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असं म्हटलं. मात्र चांगला पती असा उल्लेख न केल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच घटस्फोटाच्या चर्चेबाबत चहलने हे खरं असू शकतं आणि नाहीही, असंही नमूद केलं होतं.

धनश्रीही बोलली

यापूर्वी धनश्री वर्मानेही तिच्या इन्स्टा स्टोरीतून भाष्य केलं होतं. सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे धनश्री वर्मा चांगलीच संतापली आहे. सोशल मीडियावरील चर्चा पाहून तिचे थेट चारित्र्य हनन झाल्याचा आरोप केला . 8 जानेवारीला धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक वक्तव्य पोस्ट केलं. धनश्रीने गेले काही दिवस कुटुंबासाठी त्रासदायक गेल्याचा उल्लेख केला तसेच नात्याबाबत सोशल मिडिया आणि वेगवेगळ्या मिडिया रिपोर्टवर निराशा व्यक्त केली . माझं मौन ही माझी कमकुवत बाजू नसून ती ताकद आहे. नकारात्मकचा ऑनलाईन सहज पसरवता येते. पण दुसऱ्यांना वर आणण्यासाठी हिम्मत आणि उदारता असावी लागते, असंही तिने लिहीलं होतं.

भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.