‘महिला स्वतःचे फोटो, व्हिडीओ…’, रश्मिका मंदानाच्या फेक व्हिडीओमधील महिला असं का म्हणाली?

Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना हिच्या फेक व्हिडीओमध्ये दिसणारी झारा पटेल आहे तरी कोण? व्हायरल व्हिडीओवर झारा हिचं खळबळजनक वक्तव्य... सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या फेक व्हिडीओमुळे वादग्रस्त वातावरण आहे. दोषींवर कारवाई करण्याची होत आहे मागणी...

'महिला स्वतःचे फोटो, व्हिडीओ...', रश्मिका मंदानाच्या फेक व्हिडीओमधील महिला असं का म्हणाली?
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 2:32 PM

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या फेक व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर, महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर रश्मिका हिच्या फेक व्हिडीओमध्ये दिसणारी महिला झारा पटेल हिने देखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे. झारा हिने व्हायरल व्हिडीओ चिंता व्यक्त केली आहे. झारा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधीत प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली आहे. डीपफेक व्हिडीओ कॉन्ट्रोवर्सीमध्ये माझा सहभाग नाही… असं वक्तव्य झारा पटेल हिने केलं आहे.

झारा पटेल म्हणाली, ‘असंच होत राहिलं तर, येणाऱ्या काळात तरुणी आणि महिला स्वतःचे व्हिडीओ – फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार नाहीत. कोणी अज्ञात व्यक्तीने माझ्या शरीराचा वापर करत, प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा लावून डीपफेक व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये माधी कोणत्याही प्रकारची भूमिका नाही… हे सर्व पाहून मला स्वतःला धक्का बसला आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे झारा पटेल म्हणाली, ‘मला तरुणी आणि महिलांसाठी भीती सतावत आहे. असचं सुरु राहिलं तर, महिला स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कधीच पोस्ट करणार नाहीत. तुम्ही इंटरनेटवर जे काही पाहाल आधी त्याचे फॅक्ट तपासून पाहा… इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तथ्य नसतं…’ सध्या सर्वत्र रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडीओ आणि झारा पटेल हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

कोण आहे झारा पटेल?

झारा पटेल एक ब्रिटिश भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे सोशल मीडियावर 4.5 लाख फॉलोअर्स आहेत. झारा व्यवसायाने डेटा अभियंता आहे. याशिवाय ती मानसिक आरोग्य वकील देखील आहे. मात्र, आता झारा एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. झारा तिच्या सोशल मीडियावर अनेकदा ॲडल्ट आणि बोल्ड कंटेंट पोस्ट करत असते.

रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडीओ

सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ डीपफेक या सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. डीपफेक हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडिया आहे. फेक व्हिडीओवर रश्मिका हिने देखील प्रतिक्रिया दिली. यावर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.