अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी महिलांवर जबरदस्ती? 3 अभिनेत्यांना अटक; धक्कादायक प्रकाराने खळबळ

पॉर्नोग्राफी ॲपसाठी महिलांना काम करण्यास भाग पाडलं जात होतं? धक्कादायक प्रकरणी 3 अभिनेत्यांना अटक.... बंगल्यात पोलिसांनी धाड टाकली आणि धक्कादायक माहिती समोर आली... प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी महिलांवर जबरदस्ती? 3 अभिनेत्यांना अटक; धक्कादायक प्रकाराने खळबळ
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 11:23 AM

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : पॉर्नोग्राफी सिनेमांचं चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी रविवारी तीन अभिनेत्यांना अटक करण्यात आली आहे. पिहू नावाच्या आधारित ॲपवर पोर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पिहू या प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ पाहण्यासाठी निर्मात्यांद्वारे दर महिन्याला युजर्सकडून पैसे आकारले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपासणी करत आहेत.

वर्सोवा पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये 20 आणि 34 वयोगटातील दोन महिला आणि 27 वयोगटातील एक पुरुष आहे. संबंधीत आरोपी पिहू या प्लॅटफॉर्म अश्लील व्हिडीओ अपलोड करत होते. एवढंच नाही तर, लोक महिलांसोबत व्हिडीओ, ऑडीओ कॉलवर देखील बोलू शकत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काही आठवड्यांपूर्वी अंधेरी पश्चिम येथून पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती स्थानिक माहितीदारांद्वारे पोलिसांनी मिळाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. रविवारी अंधेरी पश्चिम येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या शूटिंगबद्दल पोलिसांनी कळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्ट्रीमिंग शेड्यूलची माहिती युजर्सना मिळायची. यासाठी युजर्सना ऍपमधील काही कॉईन्स खरेदी करावी लागत होती. ज्यामुळे ऍपवर अपलोड होणारे व्हिडीओ युजर्सना पाहता येतील. एवढंच नाही तर, ऍपवर प्रोफाईल असलेल्या युजर्सना महिलांकडून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल सारख्या सेवा देखील मिळत होत्या…’ अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची देखील माहिती मिळत आहे. ‘ऍपवरील युजर्स पैसे कुठे जमा करत होते, याची चौकशी सध्या आम्ही करत आहोत. याबद्दल अधिक चौकशी सुरु आहे…’ अशी माहिती पोलिसांनी दिला आहे.

विशेषत: ऍपसाठी महिला त्यांच्या इच्छेने काम करत होत्या, की त्यांना अस काम करण्यास भाग पाडलं जात होतं… याची चौकशी देखील पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. संबंधीत प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे पिहू ॲप गुगल स्टोर आणि ऑपल स्टोरमधूम काढण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.