कतरिनामुळे माझं करियर बरबाद झालं, जरीन खानचा आरोप!

सलमान खानने चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रीना लॉन्च केलं आहे. त्यापैकी काही हिट ठरल्या, तर काही साइड रोल्स करून लाइम लाइटपासून दूर गेल्या.

कतरिनामुळे माझं करियर बरबाद झालं, जरीन खानचा आरोप!

मुंबई : सलमान खानने चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रीना लॉन्च केलं आहे. त्यापैकी काही हिट ठरल्या, तर काही साइड रोल्स करून लाइम लाइटपासून दूर गेल्या. झरीन खानला (Zareen Khan)  देखील चित्रपटसृष्टीत सलमान खानने आणले होते. झरीन खानने ‘वीर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पर्दापण केले यानंतर ती ‘रेडी’, ‘हाऊसफुल’ आणि ‘हेट स्टोरी 3’ सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, अशा हिट चित्रपटांमध्ये काम करूनही झरीन खान चित्रपटसृष्टीतल्या एका गोष्टीमुळे खूप चिडते कारण झरीन खानची तुलना नेहमीच अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) केली जाते. (Zareen Khan’s serious allegations against Katrina Kaif)

झरीन खानला तिची तुलना कतरिना कैफसोबत केलेले मुळीच आवडत नाही. तिचे म्हणणे आहे की, कोणत्याही चित्रपट निर्मात्याला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही होत, झरीन कतरिनासारखी दिसते आणि एकसारखीच दिसणाऱ्या अभिनेत्रीला निर्माते कास्ट करू इच्छित नाहीत. झरीन खानने याचा खुलासा एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत केला. झरीन म्हणाली अगोदर लोक मला म्हणायचे की, मी माझ्या आई सारखी दिसते मात्र, मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर मला कळल की मी कतरिना कैफसारखी दिसते.

मला कतरिना कैफसारखे दिसण्याचा खूप मोठा फटका बसला आणि बसत देखील आहे. कतरिनामुळे माझं करियर खराब झालं,  झरीना म्हणते की, गेली 11 वर्षे चित्रपटसृष्टीत मी कतरिना सारखी दिसते असे म्हणले जाते याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला आहे. विकी काैशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif ) नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. दोघेही पार्टी आणि प्रोग्राममध्येसोबत असतात एवढेच नव्हे तर या दोघांनीसोबतच नवीन वर्ष देखील साजरे केले, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत जेव्हा विकी कौशलला कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल विचारले गेले होते तेव्हा तो म्हणाला होता की, मी माझे वैयक्तिक आयुष्य सीक्रेट ठेवतो म्हणून मी याबद्दल काहीही बोलणार नाही. ‘ माझ्या आयुष्यातील सीक्रेट गोष्टी मला कोणालाही शेअर करायला आवडत नाहीत आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणी बोलत असेलतर ते मला मुळीच आवडत नाही. मला काही गोष्टी उघडपणे बोलायला देखील आवडत नाहीत.

संबंधित बातम्या : 

रागीट तैमुर आता शांत झाला, फोटोग्राफरला आता हाय हॅलो करतो…!

So Expensive | नोरा फतेहीच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर बसेल धक्का!

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, केंद्राची मोठी घोषणा!

(Zareen Khan’s serious allegations against Katrina Kaif)

Published On - 11:38 am, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI