AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zubeen Garg Death Case: झुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, मॅनेजरने विष दिलं! कोणी केलं धक्कादायक विधान

Zubeen Garg Death Case: ५२ वर्षीय झुबिन गर्गचा १९ सप्टेंबरला नॉर्थईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या दरम्यान सिंगापूरच्या लॅझरस आयलंडवर यॉट आऊटिंगदरम्यान मृत्यू झाला. तपासादरम्यान जुबिन गर्गच्या जवळच्या व्यक्तीने आणि यॉटवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दावा केला आहे की गायकाला विष देण्यात आले होते.

Zubeen Garg Death Case:  झुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, मॅनेजरने विष दिलं! कोणी केलं धक्कादायक विधान
Zubeen-GargImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 04, 2025 | 4:58 PM
Share

आसमची शान आणि भारताच्या नावाजलेल्या गायक झुबिन गर्गच्या मृत्यूची कोडी अजूनही सुटलेली नाही. त्याच्या मृत्यूनंतर एसआयटीची स्थापना झाली असली तरी, केसमध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. नुकतेच त्याच्या बँडमेटने एसआयटी चौकशीमध्ये केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता झुबिन यांचा मृत्यू अपघाताने नाही तर खून असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भारताच्या नावाजलेल्या गायक झुबिन गर्गचा १९ सप्टेंबरला सिंगापूरच्या लॅझरस आयलंडजवळ रहस्यमय मृत्यूमुळे संपूर्ण संगीत इंडस्ट्रीसह त्याचे चाहते शोकात आहेत. आता या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण एका भयानक वळणावर येऊन पोहोचले आहे. झुबिनचा दीर्घकाळाचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना १ ऑक्टोबरला एसआयटीने (विशेष तपास पथक) गुन्हेगारी कट, हत्येच्या आरोपांवर अटक केली आहे. ही कारवाई साक्षीदाराच्या विधानानंतर झाली, ज्यात आरोप आहे की गायकाला ‘विष देण्यात आलं’ होतं.

वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम

रिमांड नोटमध्ये काय आहे?

५२ वर्षीय झुबिन गर्गचा १९ सप्टेंबरला नॉर्थईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या चौथ्या आवृत्तीदरम्यान सिंगापूरच्या लॅझरस आयलंडवर यॉट आऊटिंगदरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीच्या अहवालांमध्ये बुडणं असं सांगितलं गेलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, एसआयटीने कोर्टात सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये काही वेगळंच सांगितलं आहे.

झुबिन गर्गच्या जवळच्या व्यक्ती आणि बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी यांनी एसआयटीला दिलेल्या विधानात (कलम १७५ बीएनएसएस) आरोप केला आहे की मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हल आयोजक श्यामकानू महंत यांनी गायकाला विष दिलं होतं आणि आपल्या कट यशस्वी करण्यासाठी जाणीवपूर्वक एका विदेशी ठिकाणाची निवड केली. शेखर ज्योती गोस्वामी यांच्या मते, सिद्धार्थ शर्मा यांनी यॉटवर स्वतः दारू पुरवली आणि आयोजकांना ड्रिंक्सची व्यवस्था न करण्यास सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की गायकाच्या मॅनेजरने त्यांना यॉटचा कोणताही व्हिडीओ कोणाशीही शेअर न करण्याचा निर्देश दिला होता. याशिवाय, त्यांनी यॉटचं नियंत्रण जबरदस्तीने आपल्या हातात घेतलं ज्यामुळे नाव अस्थिर झाली.

गायकाच्या तोंड-नाकातून फेस

साक्षीदाराचा दावा आहे की झुबिन हे उत्कृष्ट पोहणारे होते आणि त्यांनी स्वतः शर्मा यांना ट्रेनिंग दिली होती. अशा परिस्थितीत अपघाताने बुडणं जवळपास अशक्य आहे. झुबिनच्या शेवटच्या क्षणांत जेव्हा ते श्वास घेण्यासाठी झगडत होते आणि तोंड-नाकातून फेस निघत होता, तेव्हा सिद्धार्थ शर्मा यांनी याला ‘एसिड रिफ्लक्स’ म्हणून टाळून दिलं. कथितरित्या ओरडले ‘जाऊ द्या, जाऊ द्या’ (त्याला जाऊ द्या, जाऊ द्या). एसआयटीच्या रिमांड नोटमध्ये झुबिनच्या को-सिंगर अमृत प्रभा महंता आणि अभिनेत्री निशिता गोस्वामी यांच्या विधानांचाही उल्लेख आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?