FEATURED

सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? मोठं कारण समोर, वेगवान घडामोडी

मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. नितीश कुमार हे मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मोठं कारण समोर आलं आहे.

सर्वात मोठी बातमी! नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? मोठं कारण समोर, वेगवान घडामोडी
NITESH KUMAR
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 4:40 PM

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगलं होतं. भाजप आणि काँग्रेस आमने-सामने होते. निवडणुकीमध्ये एनडीएला दणदणीत यश मिळालं. काँग्रेस आणि मित्र पक्षांचा मोठा पराभव झाला. दरम्यान त्यानंतर जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे काही कारणांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. नितीश कुमार हे मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मोठं कारण समोर आलं आहे.

बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे, समोर आलेल्या माहितीनुसार नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कालपर्यंत निशांत कुमार हे राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा समोर येत होती. मात्र आता बिहारमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. कालपर्यंत निशांत कुमार हे राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे.

जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा हे दिल्लीवरून पटनाला रवाना झाले आहेत. संजय झा हे दिल्लीवरून पटनाकडे रवाना होताच आता नितीश कुमार हे राज्य सभेवर जाणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. दरम्यान जर नितीश कुमार हे राज्यसभा खासदार झाले. बिहारच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात आले तर बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांचे चिरंजीव हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. तर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जेडीयूकडून अत्यंत महत्त्वाची बैठक देखील बोलवण्यात आली आहे. याच बैठकीत आता पुढची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.

 

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Follow Us