गुगल आणि अॅपल प्ले स्टोरवरुन टिक-टॉकचे डाऊनलोडिंग लवकरच बंद होणार

नवी दिल्ली : सध्या तरुणाईमध्ये ‘टिक-टॉक’ TikTok app या व्हिडीओ अॅपची मोठी क्रेझ आहे. या अॅपद्वारे अनेकजण एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करुन व्हिडीओ बनवतात आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण गेल्या कित्येक दिवसांपासून या अॅपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ समोर येत होते. यामुळे मद्रास हायकोर्टासह सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला ‘टिक-टॉक’ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश …

गुगल आणि अॅपल प्ले स्टोरवरुन टिक-टॉकचे डाऊनलोडिंग लवकरच बंद होणार

नवी दिल्ली : सध्या तरुणाईमध्ये ‘टिक-टॉक’ TikTok app या व्हिडीओ अॅपची मोठी क्रेझ आहे. या अॅपद्वारे अनेकजण एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करुन व्हिडीओ बनवतात आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण गेल्या कित्येक दिवसांपासून या अॅपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ समोर येत होते. यामुळे मद्रास हायकोर्टासह सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला ‘टिक-टॉक’ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. यानुसार केंद्र सरकारने गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरुन टिक-टॉक अॅप हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला टिक-टॉक आता कायमच बंद होणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ‘टिक-टॉक’ या म्युझिकल व्हिडीओ अॅपने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण कित्येकदा ‘टिक-टॉक’द्वारे अश्लील व्हिडीओही तयार करण्यात येतात. त्यामुळे ‘टिक-टॉक’वर बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान ‘टिक-टॉक’ अॅपच्या डाऊनलोडिंगवर बंदी घालावी असे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. तसंच सर्व प्रसारमाध्यमांनीही टिक-टॉकवर तयार करण्यात येणार व्हिडीओ प्रदर्शित करणे टाळावे, असेही हायकोर्टाने म्हटलं होतं.

यानंतर काही युजर्सने मद्रास हायकोर्टाविरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. त्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान टिक-टॉक अॅपमुळे अश्लील व्हिडीओ किंवा फोटोचे प्रदर्शन होत आहे. त्यामुळे टिक-टॉकवर केंद्र सरकारने ताबडतोब बंदी घालावी, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला गुगल आणि अॅपल प्ले स्टोअरवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार  इलेक्ट्रॉनिक्स और माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या अॅपचे डाऊनलोडिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण ज्या युर्जसने हे अॅप आधीच डाऊनलोड केले आहेत, ते मात्र या अॅपचा वापर करु शकणार आहेत. याबाबत पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे.

‘टिक-टॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक-टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झाले. 73 एमबीचे हे अॅप असून याचे 500 मिलियन अर्थात 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत.

संबंधित बातम्या :

तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘टिक टॉक’वर हायकोर्टाकडून बंदी

टिक टॉक अॅपवर बंदी की नाही? सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *