आंबा प्रकरण : संभाजी भिडे कोर्टात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नाशिक : माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आज कोर्टात हजर राहणार आहेत. नाशिकमधील कोर्टात हजर राहण्याचे संभाजी भिडेंना आदेश होते. त्याप्रमाणे ते कोर्टात हजर राहण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. संभाजी भिडे हे कोर्टात हजेरीसाठी येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला …

sambhaji bhide, आंबा प्रकरण : संभाजी भिडे कोर्टात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नाशिक : माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आज कोर्टात हजर राहणार आहेत. नाशिकमधील कोर्टात हजर राहण्याचे संभाजी भिडेंना आदेश होते. त्याप्रमाणे ते कोर्टात हजर राहण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

संभाजी भिडे हे कोर्टात हजेरीसाठी येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रकरण काय आहे?

नाशिकमध्ये जून महिन्यात एक सभा झाली. त्या सभेत श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचं भाषण झालं. या भाषणात संभाजी भिडे यांनी अत्यंत अजब दावा केला. या दाव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. अंधश्रद्धा पसरवत असल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला. त्यानंतर त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवरच आज नाशिकच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

संभाजी भिडेंनी काय दावा केला होता?

“भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.”, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *