कोरोनाने सोसाट्यांना घेरलं, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना संसर्ग 10 टक्क्यांपेक्षाही कमी

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असला तरी झोपडपट्ट्यांमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वात कमी आहे. (90% cases of Covid in non-slums In Mumbai)

कोरोनाने सोसाट्यांना घेरलं, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना संसर्ग 10 टक्क्यांपेक्षाही कमी
Coronavirus- प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 11:09 AM

मुंबई: मुंबईतील कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असला तरी झोपडपट्ट्यांमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वात कमी आहे. तर मोठमोठ्या सोसायट्या आणि कॉलनीत राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, सोसायटीतील रहिवाशांनी सावध राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (90% cases of Covid in non-slums In Mumbai)

मुंबईसह संपूर्ण राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: घेरले आहे. मुंबईत तर रोज हजारो रुग्ण सापडत आहेत. कोरोना बळींची संख्याही वाढली आहे. सध्या मुंबईत 87 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यातील 90 टक्के रुग्ण मुंबईच्या सोसायटी आणि कॉलनीतील आहेत. बाकी उरलेले दहा टक्के रुग्ण हे मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील आहे.

सोसायटीत रुग्ण किती?

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 79,032 रुग्ण नॉन स्लम परिसरातील आहे. तर 8411 रुग्ण मुंबईतील विविध भागातील आहेत. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला असून कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून धारावीकडे पाहिले जात आहे.

20 लाख लोक कंटेन्मेंट झोनमध्ये

जुलैमध्ये 57 टक्के केसेस झोपडपट्ट्यांमध्ये पाहायला मिळाले होते. तर 16 टक्के केसेस नॉन स्लम एरियात होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येताच सर्व चित्रं बदलून गेलं आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सध्या 1169 बिल्डिंग सील आहेत. तर 10 हजार फ्लोअर सील झालेले आहेत. यात सर्वाधिक 20 लाख लोक राहतात. म्हणजे सुमारे 20 लाख लोक कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. ज्या इमारतीत पाचहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत त्या ठिकाणी अॅक्शन घेतली जात आहे.

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती: 

गेल्या 24 तासांतील नवे रुग्ण: 7,381 गेल्या 24 तासांतील मृत्यू: 58 एकूण रुग्ण: 5,86,867 सक्रिय रुग्ण: 85,321 एकूण मृत्यू: 12,412  (90% cases of Covid in non-slums In Mumbai)

संबंधित बातम्या:

फोटो फिचर: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! आज ‘या’ एक्सप्रेस रद्द; घरातून निघताना लिस्ट चेक करा

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा, कैद्याचा तुरुंगात कोरोनाने मृत्यू

ICSE board exam: कोरोनाच्या धोक्यामुळे ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

(90% cases of Covid in non-slums In Mumbai)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.