AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं

संपूर्ण महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवणारी घटना घडली आहे. H3N2 व्हायरसचा पहिला रुग्ण दगावला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं
Image Credit source: Google
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 15, 2023 | 8:30 AM
Share

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. सध्या महाराष्ट्रात 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहे. तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृत्यू झालेला तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने मृत्यू झालेला तरुण मागील आठवड्यात कोकणात फिरायला गेला होता. कोकणातून फिरून आल्यावर तो आजारी पडला होता. त्याला सर्दी, ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आली होती.

त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी सोबतकह H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसची चाचणी करण्यात आली त्यातही तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हाच तरुण पहिला मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार असून फिरायला गेलेल्या सर्वांची चाचणी केली असून त्यांचे अहवाल प्रलंबित असून त्याची प्रतीक्षा केली जात आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाबत चिंता वाढवणारी बाब निर्माण झाली आहे. या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढणार असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. अशातच अहमदनगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे. दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.

कोरोना काळात अनेकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केळ्यांमुळे किंवा माहिती दडवून ठेवल्याने प्रसार झाल्याचे बोललं जाऊ लागलं होतं, त्यामुळे वेळीच उपचार घेऊन आरोग्य यंत्रणेनेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

Follow Us
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने