AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबीपासून बनवा काही मिनिटांत तयार होणारे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ

कोबी ही पोषक तत्वांनी समृद्ध भाजी आहे. पण आपल्यापैकी असे बरेच जण आहेत ज्यांना कोबी खायला अजिबात आवडत नाही. पण आजच्या लेखात आपण कोबीपासून कोणते चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ सहजपणे बनवता येतात ते जाणून घेऊयात.

कोबीपासून बनवा काही मिनिटांत तयार होणारे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ
| Edited By: | Updated on: Aug 10, 2026 | 4:02 PM
Share

आजकाल अनेक लोक चविष्ट पदार्थांसोबतच आरोग्यदायी पदार्थांनाही पसंती देत ​​आहेत. अशा अनेक भाज्या आहेत ज्यांचा वापर करून खमंग आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतात. कोबी ही अशाच भाज्यांपैकी एक आहे, जी अनेक घरांमध्ये अनेकवेळा बनवली जाते. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यामुळे कोबीला आरोग्यदायी आहाराचा एक भाग मानले जाते.

पण कोबीची भाजी म्हंटली की आजकाल आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. तर अशावेळेस कोबीची भाजी बनवण्याऐवजी त्यापासून काही चविष्ट असे काही मिनिटांतच बनवता येणारे पदार्थ आहेत. हे नाश्त्यात दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी खाल्ले जाऊ शकते. योग्य प्रकारे बनवलेले हे पदार्थ चव आणि पोषण या दोन्हींचा उत्तम मिलाफ ठरू शकतात. चला तर मग आरोग्यदायी कोबी पासून बनवता येणाऱ्या पदार्थांची झटपट रेसिपी जाणून घेऊयात.

घरी बनवण्यासाठी कोबीच्या पौष्टिक पाककृती

कोबी चीला

बेसनमध्ये बारीक चिरलेली कोबी, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, लाल मिरची आणि मीठ टाकून मिश्रण तयार करा. तव्यावर थोडे तेल टाका. आता त्यावर तयार मिश्रण टाका आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवा. हा चीला फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि पचनक्रिया सुधारते.

कोबी रायता

बारीक चिरलेली किंवा अर्धी कच्ची उकडलेली कोबी दह्यामध्ये मिक्स करा. त्यात भाजलेले जिरे, काळे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करा. हा रायता उन्हाळ्यात थंडावा देणारा आणि पचनासाठीही चांगला मानला जातो. दह्यामधून प्रथिने आणि कॅल्शियम, तर कोबीमधून फायबर आणि व्हिटॅमिन सी मिळते.

कोबीची भाजी

एका नॉन-स्टिक पॅनमध्ये बारीक चिरलेली कोबी, गाजर आणि शिमला मिरची टाका. 2 ते 3 मोठे चमचे पाणी टाकून 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. नंतर, काळी मिरी, थोडे मीठ आणि लिंबाचा रस घालून चवीनुसार मसाला टाका. कोबीमधील पोषक तत्वे टिकवून ठेवण्यासाठी ते जास्त शिजवू नका. ही एक हलकी, कमी कॅलरी असलेली भाजी आहे, जी फायबर आणि व्हिटॅमिन सी पुरवते.

कोबी सॅलड

बारीक चिरलेली कोबी, गाजर, काकडी, टोमॅटो आणि कांदा एकत्र करा. त्यात लिंबाचा रस, मिरीपुड आणि थोडे मीठ टाकून चांगले मिक्स करा. इच्छित असल्यास भाजलेले तीळ देखील सॅलडमध्ये टाकू शकता. हे सॅलड फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात.

कोबी खरेदी करताना आणि बऱ्याच दिवस ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

कोबी विकत घेताना, ताजी, टणक आणि हिरवी पाने असलेली कोबी निवडा. डाग पडलेली, खराब झालेली किंवा जास्त पिवळी झालेली पानं असलेली कोबी खरेदी करू नका. घरी आणल्यावर कोबी न धुता रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. गरज असेल तेव्हाच ती धुऊन वापरा.

तुमच्याकडे काही उरलेली कोबी असल्यास ती लवकर खराब होऊ नये म्हणून घट्ट झाकून फ्रिजमध्ये ठेवा. ताज्या कोबीमध्ये तिची चव आणि पोषणमूल्ये दोन्ही टिकून राहतात.

कोबी खाताना कोणी काळजी घ्यावी?

ज्या लोकांना गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यांनी कोबीचे सेवन मर्यादित ठेवावे, कारण काही लोकांमध्ये त्यामुळे या समस्या वाढू शकतात. थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी आपल्या आरोग्यानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोबीचे सेवन करावे.

जर कोणाला कोबीची ॲलर्जी असेल, तर त्यांनी त्याचे सेवन करू नये. बहुतेक लोकांसाठी माफक प्रमाणात कोबी खाणे सुरक्षित मानले जाते, परंतु तुम्हाला काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?