Amino acid rich foods : उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ‘अमिनो अॅसिड’; त्याची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन

अमिनो अॅसिड-समृद्ध अन्न: शरीर निरोगी राहावे यासाठी, पोषक तत्वे खूप महत्त्वाचे असतात. अमीनो ऍसिड शरीरात प्रथिने तयार करण्याचे काम करते. यामुळे निद्रानाश, तणाव आणि वजन कमी होण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या, कोणते पदार्थ खाल्ल्याने अमिनो अॅसिड ची कमतरता दूर होते.

Amino acid rich foods : उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ‘अमिनो अॅसिड’; त्याची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
फाईल फोटो
Image Credit source: Google
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jul 05, 2022 | 10:12 PM

मुंबई : निरोगी राहण्यासाठी इतर पोषक तत्वे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यापैकी एक पोषक घटक (Nutrients) म्हणजे अमीनो ऍसिड. अमीनो ऍसिड (Amino acids)शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी ओळखले जातात. हे स्नायू तयार करण्यास मदत करते. हे पेशींच्या निर्मितीस मदत करतात. त्यामुळे शरीर मजबूत राहण्यास मदत होते. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. यामुळे निद्रानाश, तणाव आणि वजन कमी होण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. शरीरात अमीनो ऍसिडच्या कमतरतेमुळे, कमकुवत प्रतिकारशक्ती, स्मरणशक्ती कमी होणे, कमकुवत हाडे आणि चिडचिडेपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत अमिनो अॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश करू शकता. जाणून घेऊया,अमीनो अॅसिडने समृद्ध असलेले कोणते पदार्थ आहारात समाविष्ट (Included in the diet) केले जाऊ शकतात.

क्विनोआ

क्विनोआ “कीन-वाह” म्हणून उच्चारली जाते. या प्रथिने समृद्ध धान्यात प्रत्येक अमीनो अॅसिड असते. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तसेच फायबरचा चांगला स्रोत आहे. याशिवाय यात अमीनो अॅसिडही असते. क्विनोआमध्ये गहू किंवा तांदूळपेक्षा जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे इतर धान्यांपेक्षा त्यात अमीनो जास्त असते.

अंडी

अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यात सर्व आवश्यक अमीनो ऍसिड असतात. म्हणून, आपण आहारात अमीनो ऍसिड समृद्ध अन्न अंडी देखील समाविष्ट करू शकता.

कॉटेज चीज

असे मानले जाते की 100 ग्रॅम कॉटेज चीजमध्ये दैनंदिन गरजेच्या सुमारे 25 टक्के प्रथिने आणि आवश्यक प्रमाणात अनेक अमीनो ऍसिड असतात.

मशरूम

मशरूममध्ये सर्व आवश्यक अमीनो ऍसिड देखील असतात. तुम्ही तुमच्या आहारात मशरूमचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. तुम्ही सॅलड आणि करीच्या स्वरूपातही याचे सेवन करू शकता.

मासे

अत्यावश्यक अमीनो ऍसिड बहुतेक माशांमध्ये आढळतात. सॅल्मन हे अमीनो अॅसिड आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे. ओमेगा ३ फॅटी अॅसिड हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे इतर अनेक आरोग्य फायदे देखील प्रदान करते.

बीन्स आणि मसूर

सोयाबीन आणि मसूर भारतीय घरांमध्ये सर्रास वापरतात. ही प्रथिने उत्तम स्रोत आहेत. सोयाबीन देखील अमीनो ऍसिडचा चांगला स्रोत आहे. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

हिरव्या भाज्या

आपल्याला सहसा हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या भाज्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. रक्ताची कमतरता दूर करण्याचे काम करते. या भाज्यांमध्ये अमिनो अॅसिडही असते.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें