AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणं टाळा… जाणून घ्या!

तुम्हीही तुमचे वजन कमी करू इच्छित असाल तर पाच पांढरे पदार्थ खाणं टाळा जेणेकरून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकाल.

Weight Loss : व्यायाम न करता बारिक व्हायचंय, फक्त हे पाच पदार्थ खाणं टाळा... जाणून घ्या!
| Updated on: Jun 14, 2023 | 10:09 PM
Share

Health : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. तसंच दररोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामही करायला वेळ मिळत नाही त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहत नाही. मग आपले वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. जर तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं तर हे पाच पांढरे पदार्थ खाणं टाळा जेणेकरून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकाल.

तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात बदल करावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या आहारातून पाच पांढरे पदार्थ काढून टाकावे लागतील. या संदर्भात वेदांत हॉस्पिटलचे एंडोवस्कुलर डॉ. राजीव पारख यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी वजन कमी करण्यासाठी आहारातून पीठ, तांदूळ, साखर, दूध आणि मीठ या पदार्थांना वगळण्यास सांगितलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी पिठापासून बनवलेले पदार्थ , पांढरा भात, साखर आणि साखरेचे पदार्थ तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ आणि मीठ खाणं बंद करावं. विशेषतः रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाणं बंद करावे असं केल्याने तुमचे वजन सहज कमी होईल आणि त्याचा प्रभाव तुम्हाला एका आठवड्यात दिसून येईल.

पुढे डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या चार तास आधी जेवण करा. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नका कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्याने वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे तुम्ही जर ही चूक करत असाल तर ती लगेच सुधारा त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागेल.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.