AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits of eating figs : दिवसा खा इतके अंजीर; जाणून घ्या, ‘हे’ ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळू शकतात

अंजीर सामान्यतः लोक ड्रायफ्रुट्सच्या रूपात खातात. उन्हाळ्यात अंजीर पाण्यात किंवा दुधात भिजवून खावे. जाणून घ्या, दिवसभरात किती अंजीर खावेत आणि हे ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळू शकतात.

Benefits of eating figs : दिवसा खा इतके अंजीर; जाणून घ्या, ‘हे’ ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळू शकतात
ड्रायफ्रूट
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 26, 2022 | 9:35 PM
Share

मुंबई : अंजीरला सुपरफूड देखील म्हटले जाते, कारण ते शरीराला ऊर्जावान ठेवते. शरीरात ऊर्जा टिकवून (Conserving energy) ठेवण्यासोबतच अंजीर अनेक आजारांपासूनही आपले संरक्षण करते. यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होत असल्याचे अनेक रीपोर्टमध्ये समोर आले आहे. अंजीर हे एक कोरडे फळ आहे, जे जीवनसत्त्वे ए, सी, ई, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे आणि पोटॅशियम सारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी समृद्ध (Rich in nutrients) आहे. यातील अँटिऑक्सिडंट्स पोटदुखी, बद्धकोष्ठता, कमी प्रतिकारशक्ती यासारख्या आरोग्य समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात. अंजीरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक देखील आढळतात, जे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध (Rich in antioxidants) असतात, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात अंजीर पाण्यात किंवा दुधात भिजवून खावे. जाणून घ्या, दिवसात किती अंजीर खावेत आणि हे ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळू शकतात.

एका दिवसात दोनदा अंजीर खा

आरोग्य तज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दररोज अंजीराचे सेवन केले पाहिजे आणि ते नेहमी भिजवलेले असावे. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने दिवसातून किमान दोनदा अंजीर खावे. त्याची संख्या जास्तीत जास्त ४ असावी. यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला नुकसान होऊ शकते.

  1. अंजीर खाऊन, मिळवा हे फायदे अयोग्य जीवनशैलीमुळे आपली हार्मोनल प्रणाली विस्कळीत राहते, ज्यामुळे आपल्या शरीराला उच्च बीपी, पोटाची समस्या, लठ्ठपणा, झोप न येणं, कमी ऊर्जा अशा समस्यांनी घेरलेलं असतं. या सर्व उपचारांमध्ये अंजीर रामबाण औषधाची भूमिका बजावू शकते. तुम्हाला फक्त दुधात भिजवलेल्या अंजीराचे सेवन करायचे आहे.
  2.  जेव्हा चयापचय पातळी बिघडते तेव्हा पोटाशी संबंधित समस्या अनेकदा त्रास देतात आणि त्यामागील कारण म्हणजे फायबरची कमतरता. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते रोज खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते.
  3.   एखाद्या वयात व्यक्ती उच्च किंवा कमी रक्तदाबाची शिकार बनते. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही अंजीर भिजवलेले दूध नियमित सेवन करावे. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
  4.  अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी हे सर्व पोषक तत्व आवश्यक मानले जातात. रात्री झोपताना दुधात उकळून सेवन केल्यास जास्त फायदा होतो. हिमोग्लोबिनची कमतरता देखील अंजीर खाल्ल्याने लवकर पूर्ण होते.
  5.  अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि हृदय सुरक्षित ठेवतात. अंजीर खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि कोरोनरी धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत