Sanjay Jadhav : मुलीच्या रिलेशनशिबद्दल संजय जाधव स्पष्टच म्हणाले, ‘बॉयफ्रेंड घरी यायचे, पण मी तोंडावर…’
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: मराठी सिनेविश्वातील दिग्दर्शक संजय जाधव यांनी लेकीचे बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या वक्तव्याची चर्चा...

Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs : ‘मला तिचे बॉयफ्रेंड बिलकूल आवडत नाही, मला तिचे बॉयफ्रेंड्स पण नकोत आणि मला जावई पण नकोय…’, असं संजय जाधव नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाले आहे. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव आता त्यांच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, चक्क लेकीच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. लेक ध्रिती हिच्या अफेअर्सबद्दल संजय जाधव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बाप – लेकीच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लेकीच्या आयुष्यात येणार मुलगा तिला किती आनंदी ठेऊ शकतो, याचा विचार प्रत्येक बाप करत असतो. पण लेक कायम आपल्याकडेच राहिली पाहिजे असं देखील प्रत्येक बापाचं मन बोलत असतं. तर जाणून घ्या संजय जाधव लेकीच्या अफेअर्सबद्दल काय म्हणाले.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत संजय जाधव यांनी लेकीच्या अफेअर्सबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं. तिचे बॉयफ्रेंड मला आवडत नाहीत… असं म्हणजे जाधव म्हणाले, ‘कोणता मुलगा कशाला हवाय? मला कोणीच जावई वैगरे नकोय… मला तिचे बॉयफ्रेंड्ससुद्धा आवडत नाहीत. जेव्हा जेव्हा तिचे अफेअर्स झालेत, तेव्हा तिचे बॉयफ्रेंड घरी यायचे, ते घरी आलेले मला बिलकून आवडत नाहीत. मी त्यांच्यासोबत तोंडावर चांगलं वागतो, पण ते बिलकूल आवडत नाहीत…’
संजय जाधव पुढे म्हणाले, ‘मला की मुलं बॉयफ्रेंड म्हणून आवडत नाहीत बाकी मित्र म्हणून तुम्ही घरी या, आपण एकत्र दारु पिऊ, कॉफी घेऊ, गप्पा मारू… पण जेव्हा तुम्ही मला विचाराल की, मी तुम्हाला आवडतो का? तर नाही… अजिबात नाही… हेच माझं उत्तर आहे आणि असेल…’,असं देखील संजय जाधव म्हणले.
संजय जाधव यांनी मनातील बोलून दाखवल्यानंतर लेक ध्रीती म्हणाली, “मी आयुष्यभर माझ्या वडिलांसोबत राहायला तयार आहे. पप्पांना जेवण द्यायला मला नेहमीच आवडेल…” , सध्य सर्वत्र संजय जाधव यांच्या लेकीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.
संजय जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमाचं दिग्दर्शन करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. . ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘चेकमेट’, ‘गुरू’, ‘येरे येरे पैसा’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं आहे.
