Health care: शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायक ठरते सुपारी, जाणून घ्या सुपारीचे अनेक फायदे

सुपारीशी निगडीत असलेले उपायांना योग्य पद्धतीने करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला सुपारी (betel nut) च्या मदतीने आपल्या शरीरातील कोणत्या समस्या लवकरच दूर करता येऊ शकतात ह्याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

Health care: शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायक ठरते सुपारी, जाणून घ्या सुपारीचे अनेक फायदे
सुपारी
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 10:39 PM

मुंबई : सुपारीला पान किंवा गुटखा बनवण्यासाठी अधिकतर सुपारी (betel nut for health) चा वापर केला जातो एवढेच नाही तर पूजापाठ व धार्मिक कार्यामध्ये सुद्धा सुपारीचा वापर करणे शुभ मानले जाते. जास्त अनेकदा लोक सुपारीचा फक्त ठराविक कार्यासाठीच करत असतात आणि याबद्दल त्यांना सुपारी बद्दलची ठराविक पुरेशी माहिती देखील नसते. परंतु आपणास एक गोष्ट माहिती आहे का सुपारीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने (health problems in Marathi) सुद्धा अनेक महत्त्वाचे फायदे सांगण्यात आले आहे परंतु या बद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण सुपारीचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयोग करून घेत नाही. सुपारीचा योग्य पद्धतीने जर आपण वापर केला तर आपल्या शरीराला खूप सारे फायदे प्राप्त होतात. असे म्हटले जाते की सुपारी एक आयुर्वेदिक (Ayurveda) औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या आधारे आपण आपल्या शरीरातील अनेक आजार मुळापासून दूर करू शकतो तसेच जर तुम्हाला पोटाचे आजार झाले असतील, तोंडामध्ये वारंवार छाले येत असतील, अल्सर येत असतील या सगळ्या समस्या सुद्धा सुपारीचे सहाय्याने दूर करता येऊ शकतील. आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सुपारीच्या साह्याने आपल्या शरीरातील कोण कोणते आजार बरे करता येऊ शकते याबद्दल ही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेवूया याबद्दल.

तोंड येण्याची समस्या

जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल तर अशावेळी सुपारी खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही सुपारी, नारळ किंवा सुंठाचा काढा बनवून गुळण्या सुद्धा करू शकता, असे केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. जर तुम्हाला तोंड आले असेल तर अशावेळी सुपारी काही वेळ तोंडामध्ये धरून ठेवल्यास तुम्हाला तोंड येण्याच्या समस्येमुळे किंवा होणाऱ्या वेदनांमुळे काही प्रमाणात फरक जाणवू शकतो. एवढेच नाही तर सुपारी आणि इलायची भाजून जर आपण याची पावडर मधामध्ये मिक्स करून या पेस्टला ज्या ठिकाणी तोंड आले आहे अशा प्रभावी जागेवर लावल्यास आपल्याला वेदनेपासून मुक्तता मिळते.

पोटात कृमी जंत झाले असल्यास

बहुतेक वेळा पोटामध्ये कृमी व जंत झाल्यावर आपल्या शरीराचा योग्य प्रमाणामध्ये विकास होत नाही तसेच पोटातील जंतू व कृमी नष्ट करण्यासाठी सुपारीचा बनवलेला काढा लाभदायी ठरतो. एवढेच नाही तर सुपारीच्या फळाचे रस जरी आपण सेवन केले तरी पोटातील अनेक जंतू नष्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर आपले पोटाचे आरोग्य सुद्धा सुधारते. जर आपण आठवड्यातून एक दिवस सुपारी रस सेवन केला तर पोटाशी निगडित असलेल्या सर्व समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते.

उलटी थांबते

असे म्हटले जाते की, जर तुम्हाला वारंवार उलटीचा त्रास होत असेल तर अशा वेळी सुपारी खाल्ल्याने उलटी थांबते यासाठी सुपारी हळद आणि साखर मिसळून या प्रकारचे मिश्रण खाल्ल्याने उलटी येणे थांबते. उलटी थांबण्यासाठी सुपारीचा आपण अजून एका प्रकारे उपाय करू शकतो त्यासाठी तुम्हाला सुपारी भाजून घ्यायची आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे. ही पावडर कोमट पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये कडू लिंबाची साल थोडीशी मिक्स करून हे पाणी आपल्याला नीट उकळायचे आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाचे सेवन करायचे आहे असे केल्याने तुमची उलटी काही क्षणातच थांबून जाईल.

दात दुखी ची समस्या होते दूर

तसे पाहायला गेले तर तुम्हाला दात दुखीची समस्या उद्भवली तर या साठी लवंग एक अत्यंत महत्त्वाचा घटक पदार्थ वापरला जातो परंतु दाताच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सुपारीचा देखील वापर करू शकता. दातांच्या वेदना दूर करण्यासाठी सुपारीच्या पावडरमध्ये आपल्याला खसखस मिसळायचे आहे आणि या मिश्रणाच्या आधारे दात घासायचे आहे.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सुपारीची पावडर थेट दातांवर लावू शकता आणि त्याद्वारे ब्रश केल्याने काही वेळातच तुमच्या दात दुखीची समस्या दूर होऊन जाईल.

इतर बातम्या :

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

त्वचेवरील तीळ काढण्याच्या प्रयत्नात असाल तर थांबा! तसं केलं कॅन्सरचा धोका? जाणून घ्या काय करावं

डोकेदुखी होईल कायमची दूर, विशेष प्रकारची इम्‍प्‍लांट पद्धत करेल कमाल ,जाणून घ्या याबद्दल सविस्तर !

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.