सावधान.. तुम्हालाही जडू शकतो ‘गनोरिया’ सारखा गंभीर आजार; या आजाराची लागण झाल्यावर प्रत्येक औषध ठरते निकामी!

अलीकडेच ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीमध्ये गोनोरियाचा नवीन प्रकार आढळून आला आहे. हा स्ट्रेन गोनोरियापेक्षा खूपच धोकादायक आहे, त्यामुळे या जातीला सुपर गोनोरिया असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या सांगण्यानुसार, या व्यक्तीने कंबोडियामध्ये एका सेक्स वर्करसोबत असुरक्षित सेक्स केला होता, त्यातून त्याला या दुर्धर आजाराची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

सावधान.. तुम्हालाही जडू शकतो ‘गनोरिया’ सारखा गंभीर आजार; या आजाराची लागण झाल्यावर प्रत्येक औषध ठरते निकामी!
सावधान.. तुम्हालाही जडू शकतो ‘गनोरिया’ सारखा गंभीर आजार
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 6:25 PM

परदेशात एका महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर ऑस्ट्रेलियन पुरुषांमध्ये ‘सुपर गोनोरिया‘ (Super Gonorrhea) या दुर्धर आजाराचा नवीन प्रकार आढळून आला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा संसर्ग बरा करणाऱ्या प्रतिजैविकांचाही आढळून आलेल्या या नव्या स्ट्रेनवर कोणताही परिणाम होत नाही. सुपर गोनोरिया नावाचा हा प्रकार दुसऱ्यांदा सापडला आहे. वर्ष-2018 च्या सुरुवातीला अनेक देशांमध्ये हा प्रकार सापडत होता. आजाराच्या तपासणी अहवालानुसार, या व्यक्तीने एप्रिल 2022 मध्ये कंबोडियामध्ये असताना तेथील एका सेक्स वर्करसोबत असुरक्षीत संभोग (Unprotected intercourse) केला होता. त्यानंतर 5 दिवसांनी, त्याला लघवी करताना प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना (Pain in the private part) होत असल्याची पहिल्यांदा जाणीव झाली. हायर अँण्टी बायोटीक्स प्रकारातील प्रतिजैवीक औषध ॲझीथ्रोमायसीनचा त्या रुग्णाच्या संसर्गावर कुठलाच परिणाम झालेला आढळून आला नाही.

कुठलेच औषध काम करत नाही

गोनोरियापेक्षा खूपच धोकादायक आहे, त्यामुळे या जातीला सुपर गोनोरिया असे नाव देण्यात आले आहे. ॲझीथ्रोमायसीन हे गोनोरियाच्या उपचारासाठी वापरात असलेले प्रभावी प्रतिजैविकांपैकी एक आहे. याशिवाय, सेफ्ट्रियाक्सोन, सेफेक्झीम, सेफोटॅक्सीम, सिप्रोफ्लॉझेसीन आणि टेट्रासाइक्लिन या सारख्या इतर पर्यायी आणि सर्वाधीक शक्तिशाली प्रतिजैविकांचा वापर करुनही त्याच्या आजारावर कुठलाच फरक पडला नाही. सीडीसीने या विषयावर आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, गोनोरिया किंवा त्याच्या संसर्गाचा धोका केवळ शारीरिक संबंध ठेवतांना आणि संक्रमित व्यक्तीशी संबंध न ठेवता संरक्षण वापरून कमी केला जाऊ शकतो. गोनोरिया म्हणजे काय, त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊया

काय आहे गोनोरिया

गोनोरिया हा लैंगिक संक्रमित संसर्गजन्य आजार आहे. जो संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्यामध्ये पसरतो. पुरुष आणि महिला दोघांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. गोनोरिया अनेकदा मूत्रमार्ग, गुदाशय आणि घसा प्रभावित करते. याचा महिलांमध्ये गर्भाशय किंवा गर्भाशयावरही परिणाम होऊ शकतो. गोनोरिया बहुतेक वेळा योनिमार्गातून, तोंडावाटे किंवा गुदद्वारासंबंधीच्या संभोगाद्वारे प्रसारित केला जातो आणि संक्रमित आईकडून मुलांमध्ये देखील पसरु शकतो. मुलांमध्ये गोनोरियामुळे डोळ्यांवर त्याचा परिणाम दिसून येतो.

हे सुद्धा वाचा

गोनोरियाची लक्षणे

बऱ्याच प्रकरणांमध्ये, गोनोरियाच्या संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत. जरी त्याची लक्षणे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात दिसू शकतात, परंतु त्याची लक्षणे सामान्यतः जननेंद्रियामध्ये आढळतात.

ही लक्षणे पुरुषांमध्ये दिसून येतात

– लघवी करताना वेदना होणे – प्रायव्हेट पार्टमधून पूसारखा स्त्राव – अंडकोषांभोवती वेदना आणि सूज

ही लक्षणे महिलांमध्ये दिसून येतात

– योनीतून जास्त स्त्राव – लघवी करताना वेदना होणे – संभोग दरम्यान योनीतून रक्तस्त्राव – ओटीपोटात आणि ओटीपोटाचा खालचा भाग दुखणे

शरीराच्या वेगवेगळ्या भागात लक्षणे दिसणे

रॅक्टम – प्रमेहाच्या लक्षणांमध्ये गुद्द्वारात खाज सुटणे, गुदद्वारातून पूसारखा स्त्राव आणि रक्तस्त्राव यांचा समावेश होतो. डोळे – डोळ्यांवरही गोनोरियाची लक्षणे दिसतात, त्यामुळे डोळ्यांत दुखणे, प्रकाशाकडे पाहता न येणे आणि डोळ्यांतून पू होणे. घसा – संसर्गामुळे घशात सूज येण्याची शक्यता असते.

गोनोरियामुळे 25 वर्षांखालील स्त्रिया ज्या लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेत आणि समलिंगी संबंध प्रस्थापित करणाऱ्या पुरुषांना गोनोरिया होण्याचा धोका जास्त असतो.

या कारणांमुळे देखील गोनोरिया होतो

– नवीन व्यक्तीसोबत असुरक्षीत संभोग करणे – एकापेक्षा अधीक व्यक्तींशी शरीरसंबध ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे – एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.