‘आमचे रुग्ण मरु द्यायचे का?’ अहमदनगरमध्ये रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठ्यात मोठं अंतर, नातेवाईकांचा संताप

अहमदनगरमध्ये अनेक ठिकाणी रेमडेसिवीर तर उपलब्ध नाहीच, पण सोबत रेमडेसिवीरला पर्याय म्हणून सुचवण्यात आलेली औषधंही मिळत नसल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

'आमचे रुग्ण मरु द्यायचे का?' अहमदनगरमध्ये रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठ्यात मोठं अंतर, नातेवाईकांचा संताप
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 3:09 AM

अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच स्थिती आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर तर उपलब्ध नाहीच, पण सोबत रेमडेसिवीरला पर्याय म्हणून सुचवण्यात आलेली औषधंही मिळत नसल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. औषधांसाठी वणवण फिरुनही औषधं मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक घायकुतीला येऊन संताप व्यक्त करत आहेत. औषधं मिळत नसतील तर आम्ही आमचे रुग्ण मरु द्यायचे का? असाच सवाल हे रुग्ण व्यक्त करत आहेत. अहमदनगरमध्ये काही ठिकाणी ऑक्सिजन तुटवड्याच्याही तक्रारी रुग्ण करत आहेत (Big shortage of Remdesivir and other medicines in Ahmednagar amid Corona infection).

डॉक्टरांकडून 50 रेमडेसिवीरच्या मागणीनंतर 2 रेमडेसिवीरचा पुरवठा

संगमनेरमधील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरांनी सांगितलं, “कोविड सेंटरमधील रुग्णांच्या तब्येतीनुसार आणि आवश्यकता तपासून 50 रेमडेसिवीरची मागणी झाल्यानंतर केवळ 2 किंवा 3 व्हायल्सचा पुरवठा होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याशिवाय रेमडेसिवीरला पर्याय म्हणून जी औषधं सुचवण्यात आलीत त्यांचाही व्यवस्थित पुरवठा होत नाहीये. त्या पर्यायी औषधांचाही तुटवडा आहे. पर्यायी औषध उत्पादन कंपन्यांना वेळीच उत्पादन वाढवण्याबाबत सूचना न गेल्यानेच नियोजन बिघडून हा तुटवडा जाणवत आहे असं प्राथमिक पातळीवर दिसतंय.”

जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले, “जिल्ह्यात साधारणतः 20,000 रुग्ण आहेत. 10 टक्क्यांप्रमाणे अहमदनगरमध्ये 2,000 रेमडेसिवीरच्या व्हायल्स येणं आवश्यक आहे. आपल्याकडे 1100 ते 1200 इतके व्हायल्स येतात. काही वेळी डेपो बंद असल्याने किंवा इतर कारणांनी या औषधांचा साठा येत नाही. अनेक रुग्णांचे आणि नातेवाईकांचे मला फोन येत असतात. मला त्यांना ही वस्तूस्थिती समजून सांगायची आहे की ज्या खासगी रुग्णालयांचं मायलॉन, कॅडिला या कंपन्यांशी करार झालाय त्यांना रेमडेसिवीरचा साठा थेट कंपनीकडून येतो. उर्वरीत रुग्णालयं त्यांची मागणी होलसेलर किंवा स्टॉकिस्टकडे नोंदवतात. त्याप्रमाणे एफडीएचे अधिकारी अशा रुग्णालयांना रुग्णांची संख्या आणि मागणीप्रमाणे ही औषधं देतात. एफडीएचे अधिकारी स्टॉकिस्टकडे बसलेले आहेत ते प्रत्येक जिल्ह्याला औषधं उपलब्ध करुन देते.”

“1200 रेमडेसिवीरचं अलोकेशन असलं तरी काहीवेळा 150 व्हायल्सचा पुरवठा”

“एफडीएमार्फत स्टॉकिस्टकडून औषधं मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जितक्या व्हायल्स येतात त्या प्रमाणात रुग्णालयांना दिले जातात. रुग्णालयांना रिमाच्या व्हायल्सवर रुग्णांची नावं लिहून जपून ठेवण्यास सांगितले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोणताही साठा येत नाही. केवळ स्टॉकिस्टकडे आलेला साठा करार न झालेल्या रुग्णालयांना वितरण करण्याचं कागदोपत्री काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केलं जातं. रेमडेसिवीरचा साठा कधी सकाळी येतो, तर कधी सांयकाळी येतो. आपल्याला अलोकेशन 1200 चं असलं तरी काहीवेळा 150 व्हायल्स येतात. त्यानंतर 4 वाजता 250 व्हायल्स येतात. त्याप्रमाणे वितरणाचं नियोजन सुरु असतं,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

VIDEO | अहमदनगरमध्ये तहसीलदार ज्योती देवरेंकडून कोरोनाबाधित वृद्धावर अंत्यसंस्कार

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नगरमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, रात्रभर पुरेल एवढाच साठा शिल्लक

VIDEO: भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता डाफरला, थोरात म्हणाले, बाळा तुझं जितकं वय, तितकं माझं राजकारण

व्हिडीओ पाहा :

Big shortage of Remdesivir and other medicines in Ahmednagar amid Corona infection

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.