AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blood Donation : ‘रक्तदान’ करून मिळवा अनेक आरोग्यदायी फायदे; हदयरोग, कर्करोगापासून संरक्षणाबरोबरच वजनही राहील नियंत्रणात!

जागतिक रक्तदाता दिन 2022 : रक्तदानाला सर्वात मोठे दान मानले जाते. रक्तदानामुळे दुसऱयाचा जिव तर वाचतोच त्यासोबतच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीलाही आरोग्याचे अनेक फायदे होतात. जाणून घ्या, रक्तदान करणाऱयांला काय फायदे होतात.

Blood Donation : ‘रक्तदान’ करून मिळवा अनेक आरोग्यदायी फायदे;  हदयरोग, कर्करोगापासून संरक्षणाबरोबरच वजनही राहील नियंत्रणात!
रक्तदानImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 9:29 PM
Share

मुंबई : रक्तदानाला महादान म्हणतात कारण ते इतरांना नवजीवन देऊ शकते. सामान्यत: लोक रक्तदान करण्यास संकोच करतात. कारण त्यांना असे वाटते की, यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कमी (Low hemoglobin) होईल आणि शरीरात अशक्तपणा येईल. पण तुम्हाला माहित आहे का की, रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. रक्तदान केल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून वाचते, तसेच मनालाही सकारात्मकता (Positiveness of mind) येते. रक्तदानाबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. रक्तदान केल्याने, दात्याला हदयरोग, कर्करोगापासून संरक्षण (Cancer protection) मिळते यासोबतच वजन कमी होण्यास आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यातही रक्तदान उपयोगी ठरते. जाणून घेऊया, रक्तदानाने काय फायदे होतात.

हृदयरोग आणि कर्करोगापासून संरक्षण

असे म्हटले जाते की, जर तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरात लोह संतुलित राहते. अशा प्रकारे, हृदय सर्व रोगांच्या जोखमीपासून संरक्षित ठेवता येते. रक्त शुद्धीकरणामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

वजन नियंत्रणात राहते

लठ्ठपणा हे सर्व रोगांचे मूळ आहे असे म्हणतात. परंतु तुम्ही वेळोवेळी रक्तदान करत राहिल्यास, व्यायामासोबतच सकस आहार घेतल्यास तुमच्या कॅलरीज जलद बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते.

काही दिवसात रक्त वाढते

अनेकांना असे वाटते की रक्तदान केल्याने शरीरात रक्ताची कमतरता होईल आणि खूप अशक्तपणा येईल. पण जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते. यामुळे पुढील काही महिन्यांत लाल रक्तपेशींची पातळी समान होते.

आरोग्य तपासणीचेही फायदे

रक्तदान करण्यापूर्वी तुमच्या शरीराच्या आवश्यक चाचण्या केल्या जातात. हे तुम्हाला तुमच्या शरीराची खरी स्थिती कळू देते. तुमचे अहवाल योग्य असतील तेव्हाच तुम्ही रक्तदानासाठी पात्र समजले जातात. त्यानंतरच तुमचे रक्त घेतले जाईल. अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी केलेल्या आरोग्य तपासणीतून तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी माहिती मिळते.

मानसिक आरोग्य चांगले राहते

रक्तदान केल्याने मानसिक आरोग्य सुधारते कारण जेव्हा तुम्ही एखादे चांगले काम करता तेव्हा तुम्हाला बरे वाटते आणि तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. रक्तदान केल्याने तुम्ही एखाद्याला नवीन जीवन देत असल्याचे समाधान तुमच्या मनाला वाटते. त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.