AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: पत्ता कोबीचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे, उच्च रक्तदाबासह ‘या’ समस्येमध्ये मिळतो लाभ 

बाराही महिने सहज उपलब्ध असलेली पत्ता कोबी आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे. पत्ता कोबीच्या नियमित सेवनाने अनेक लाभ मिळतात.

Health: पत्ता कोबीचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे, उच्च रक्तदाबासह 'या' समस्येमध्ये मिळतो लाभ 
पत्ता कोबी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 06, 2022 | 8:58 AM
Share

मुंबई, पत्ता कोबी (Cabbage) ही बाराही महिने उपलब्ध असलेली भाजी आहे. रेस्टोरेंटमध्ये काही पदार्थांसोबत कच्ची पत्ता कोबी देण्यात येते. याशिवाय सूप, भाजी, सॅलड किंवा सँडविच इत्यादीमध्ये पत्ता कोबी पदार्थांची चव वाढविते तसेच अनेकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे पत्ता कोबीची भाजी बनविण्यात येते. पत्ता कोबीचे अनेक आरोग्यदायी फायदे (Health Benefits) आहेत. जाणून घेऊया पत्ताकोबीचा आहारात समावेश केल्याने कोणकोणते फायदे मिळतात.

रोग प्रतिकारशक्ती

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती व्यतिरिक्त, कोबी कोलेजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

पचन चांगले होते

फायबर आणि प्लांट स्टेरॉल भरपूर असल्याने कोबी खाल्ल्याने पचनास मदत होते. यामुळे चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते आणि शरीराला इतर आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कमी करण्यासाठी कोबी खाऊ शकता. पचन सुधारण्यासोबतच यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यातही देखील प्रभावशाली आहे.

व्हिटॅमिन के समृद्ध

कोबीमध्ये व्हिटॅमिन के आढळते. हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे  उपयुक्त आहे. यामुळे हाडे मजबूत होतात आणि रक्त गोठण्याची समस्या उद्भवत नाही. यासाठी, तुम्हाला कोबी जास्त खाण्याची गरज नाही, परंतु आठवड्यातून एक किंवा दोनदा तिचा आहारात समावेश करावा.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

लाल कोबी पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. हे खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. याशिवाय रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...