Health : वातावरणातील बदल आणि डोळ्यांच्या आरोग्यांवर परिणाम, वेळीच व्हा सावध

सध्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वाढत्या कारखानदारीमुळे आणि वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन कणांचे प्रदूषण होते. खेडेगावांमध्ये धूळ आणि वाळूचे प्रमाण जास्त असल्यामुळे वातावरण दूषित होते. कडक उन्हाळा आपल्याला जवळजवळ सहा महिने जाणवतो, वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून देखील यावर्षी अभूतपूर्व उन्हाळा आणि अत्युच्च तापमान यांचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आहे.

Health : वातावरणातील बदल आणि डोळ्यांच्या आरोग्यांवर परिणाम, वेळीच व्हा सावध
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 4:16 PM

डोळ्यांवर अशा अति उन्हाळ्याचा वाईट परिणाम अनेक प्रकारे होतो. डोळ्यांना कोरडेपणा येणे जळजळ होणे डोळे लाल होऊन आपल्या डोळ्यातील अश्रू निर्माण करणाऱ्या मेबोमियन ग्रंथी खराब होणे आणि त्यामुळे ड्राय आय सिंड्रोम असा विकार अनेकांमध्ये आढळतो. डोळे वारंवार गार पाण्याने स्वच्छ धुणे नेत्र तज्ञांचा वेळीच सल्ला घेणे आणि डोळ्यांमध्ये लुब्रिकंट औषध टाकणे असे प्राथमिक उपचार करावे लागतात जास्त कोरडेपणा असल्यास त्यासाठी ड्राय आयची आयपीएल लाईट ट्रीटमेंट करावी लागते. याबाबत डॉ. जयंत सरवटे (MBBS, MS Ophthalmology) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

उन्हाळ्यामध्ये कोरडेपणा व हवेतील प्रदूषण यामुळे डोळे येणे हा संसर्गजन्य रोग नेहमी आढळतो. डोळे येणे अर्थात व्हायरस किंवा सूक्ष्म जीवाणूंचा संसर्ग होऊन डोळे लाल होतात पापणी आणि डोळ्यांचे आवरण याला फोड येतात, घाण येऊ लागते व डोळ्यांमध्ये रक्तस्त्रावही होतो. याचा उपाय म्हणून परत परत गार पाण्याने डोळे स्वच्छ धुणे आणि नेत्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार अँटिबायोटिक आणि इतर औषधांचा वापर करणे हे उपचार करता येतात.

पावसाळ्यामध्ये शेतामध्ये असलेली बुरशी हवेतून डोळ्यांमध्ये जाते आणि बुबळाला जखम होणे कॉर्नियल अल्सर आणि पू होणे असे विकार येऊ शकतात. त्याचा वेळीच उपचार केला नाही तर डोळ्यांमध्ये कायमचे फूल पडते आणि अंधत्व येऊ शकते. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये डोळ्याच्या एलर्जीचा विकार नेहमी आढळतो याचे कारण म्हणजे हवेमध्ये असणारे पोलन्स.

या एलर्जीची औषधे काही प्रमाणात दर उन्हाळ्यामध्ये अनेक वर्षे डोळ्यांमध्ये घातली तरच ही एलर्जी कमी होऊ शकते या एलर्जीची प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे आपल्याला नियमित टाकावी लागणार आहेत हे डॉक्टरांनी पालकांच्या मनावर नीट बिंबवणे आवश्यक आहे. नाहीतर मुलांची डोळ्याची लाली आणि खाज औषधे टाकूनही कमी होत नाही म्हणून पालक डॉक्टर बदलत राहतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.