AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज चावून खा ही पाने आणि हे तीन आजार कायमचे दूर पळवा

कडूनिंबाचे रोज सेवन केले तर इम्युनिटी पॉवर चांगली होती.अनेक आजारांतून सुटका होते. शरीरात संक्रमण होण्यापासून ही पाने वाचवतात. त्वचेच्या समस्या उदा. पिंपल्स, डाग, टॅनिंग, निस्तेज त्वचा याचा उपचार देखील कडूनिंबाने होतो.

दररोज चावून खा ही पाने आणि हे तीन आजार कायमचे दूर पळवा
| Updated on: Dec 08, 2024 | 4:53 PM
Share

शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर अनेक आरोग्यास हानिकारक समस्या निर्माण होतात. एकदा कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर तिला कंट्रोल करणे कठीण असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत एक नैसर्गिक उपाय सांगितलेला आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या मते कडूनिंबाची पाने चावून खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात करता येऊ शकतो. चला तर पाहूयात आयुर्वेदिक तज्ज्ञांनी कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी कडूनिंबाची पाने चावून खाण्याचे काय फायदे असतात ?

कडूनिंबाच्या पानात औषधीय गुणधर्म असतात. यातील एंटीऑक्सीडेंट आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण कॉलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कडूनिंबाचा पाला पाहीला तरी त्यांची कडवडपणामुळे अनेक जण नाक मुरडत असतात. कडूनिंबाच्या पानांचा स्वाद जरी कडू असला तरी त्याचे गुणधर्म अत्यंत औषधी आहेत. कडूनिंबाची पाने अनेक आजारांवर रामबाण उपचार आहेत.

कडूनिंब बॅड कॉलेस्ट्रॉलला कमी करते –

कडूनिंबाच्या पानांमध्ये आढळणारी काही संयुगे बॅड कॉलेस्ट्रॉलची  ( LDL ) पातळी कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

गुड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते –

कडुनिंबाच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी ( HDL ) वाढवते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले रहाते.

कडूनिंबाच्या पानांचे फायदे –

  • कडूनिंबाच्या पानांचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये रहाते. जे कॉलेस्ट्रॉलची पातळी स्थिर राखण्यासाठी मदत करत असते.
  • ही कडुनिंबाची पाने चावून खाल्ल्याने शरीरात फ्री रेडिकल्सला कमी करते. त्यामुळे हृदयाचा धमन्यांचे आरोग्य चांगले राहाते. तसेच रक्तवाहीन्यातील चरबी हटविण्यास मदत करते.
  • यात एंटी – इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे नसांमध्ये सुज आणि रक्तांच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो.

कडूनिंबाच्या पानांचा कसा वापर करावा ?

काढा – कडूनिंबाच्या पानांना उकळून त्याचा काढा बनवावा आणि सकाळी रिकाम्या पोटी तो प्राशन करावा

कडूनिंबाची पावडर – कडुनिंबाच्या पानांना वाळवून त्याची पावडर तयार करावी आणि पाण्यासोबत घ्यावी

कडूनिंबाचा चहा – कडू निंबाचा चहा दिवसातून एकदा प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.