AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने शरीरात किती बदल होऊ शततात, तुम्हाला माहितीये?

जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. पण जेवल्यानंतर लगेच गोड खाल्ल्याने त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो... पण जेवल्यानंतर थोडी बडीशेप खाल्ल्यांने तुमच्या आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात... तर जाणून घ्या बडीशेपचे किती आणि कोणते फायदे आरोग्यास होऊ शकतात.

जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने शरीरात किती बदल होऊ शततात, तुम्हाला माहितीये?
Fennel Seeds
| Updated on: Jun 18, 2026 | 1:52 PM
Share

बडीशेप अनेकांना आवडते, पण त्याने नेमके काय फायदे आहेत, हे फार कोणाला माहिती देखील नसतील. अनेकांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते आणि ही सवय खरंच चांगली सवय आहे… बडीशेप हा एक मसाला आहे, जो सर्वांच्या स्वयंपाक घरात असतोच. अनेक जण बडीशेपचा स्वयंपाकासाठी देखील वापर करतात. कारण त्यामुळे चव वाढते. बडीशेप फक्त केवळ तोंडाला चव आणणारी गोष्ट नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. विशेषतः जेवणानंतर थोडी बडीशेप चावून खाण्याच्या सवयीमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराचे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते. एक छोटीशी सवय आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जाणून घ्या बडीशेप का खाल्ली पाहिजे.

बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बडीशेप पाचक रस आणि एन्झाइम्सच्या निर्मितीला चालना देते. यामुळे अपचन, पोट फुगणे, जठराचा त्रास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर थोडी बडीशेप खाणे पचनासाठी चांगले असते.

बडीशेप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. बडीशेपमधील नैसर्गिक सुगंधी तेल आणि जिवाणूनाशक गुणधर्म तोंडाची दुर्गंधी कमी करतात. त्यामुळे, जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्याने श्वास ताजा राहतो आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

बडीशेप डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. त्याच्या नियमित सेवनाने दृष्टीच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

बडीशेपमुळे त्वचेची चमक वाढवते. बडीशेपमधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी होण्यास मदत होते.

बडीशेप वजन नियंत्रणात मदत करते. बडीशेप भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ती चावल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि मधूनमधून काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. एवढंच नाही तर, बडीशेपमधील पोषक तत्वे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर सक्रिय राहते. पण जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहील.

Follow Us
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल