AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid 19 Guidelines : मुलांना मास्कची गरज नाही, रेमडेसिव्हीरही अजिबात नको

लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.

Covid 19 Guidelines : मुलांना मास्कची गरज नाही, रेमडेसिव्हीरही अजिबात नको
mask-covid
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 2:12 PM
Share

Covid 19 Guidelines : केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये असं या गाईडलाईन्समध्ये निक्षूण सांगितलं आहे. (Covid 19 new Guidelines for children, Masks not needed for children below 5 years discourages Remdesivir)

सौम्य लक्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांच्या आसपास असू शकते. याशिवाय घशात खवखव, श्वास घेताना, खोकताना त्रास जाणावणे यांचा समावेश आहे. शिवाय ताप असेल तर पॅरासिटामोल गोळी देताना 4-6 तासांचं अंतर ठेवा. खोकल्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करा. विलगीकरणात गेलेल्या मुलांशी पालकांनी सकारात्मक चर्चा करावी. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मुलांना 6 मिनिट वॉक टेस्ट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

मुलांना मास्कची आवश्कता नाही

नव्या गाईडलाईन्सनुसार, 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नाही. तर 6-11 वर्षाच्या मुलांनी आई-वडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावू शकतात. तसंच 12 वर्षावरील मुलं मास्क वापरु शकतात.

स्टिरॉईडवर नियंत्रण

केंद्राच्या नव्या नियमानुसार, मुलांना उपचारादरम्यान स्टिरॉईड न देण्याचा सल्ला दिला आहे. स्टिरॉईट केवळ अत्यावश्यक, गंभीर स्थितीत असलेल्याच मुलांना आवश्यकतेनुसार द्यावे. तसंच योग्य काळासाठीच अशी औषधं दिली जातील याचं भान ठेवावं, असाही सल्ला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

आता 6 फूट अंतरावरुनही कोरोना संसर्गाचा धोका, ‘या’ आहेत CDC च्या नव्या गाईडलाईन्स

BMC covid19 new guidelines : चौपाट्या ते खाऊ गल्ली, शक्य तिथे सगळीकडे कोरोना टेस्ट, BMC अॅक्शन मोडमध्ये

(Covid 19 new Guidelines for children, Masks not needed for children below 5 years discourages Remdesivir)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.