आता 6 फूट अंतरावरुनही कोरोना संसर्गाचा धोका, ‘या’ आहेत CDC च्या नव्या गाईडलाईन्स

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) नव्या गाईडलाईन्समध्ये (New CDC Guideline) सुधारणा करत 6 फूट अंतर सुरक्षित नसल्याचं सांगितलं.

आता 6 फूट अंतरावरुनही कोरोना संसर्गाचा धोका, 'या' आहेत CDC च्या नव्या गाईडलाईन्स
कोरोना व्हायरस


नवी दिल्ली : कोरोना (Corona) विरुद्ध लढायचं असेल आणि संसर्गावर नियंत्रण ठेवायचं असेल तर किमान 6 फूट अंतर पाळण्याचा प्रोटोकॉल सांगण्यात आलाय. मात्र, नव्याने झालेल्या संशोधनातून हे अंतर पुरेसं नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळेच सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) नव्या गाईडलाईन्समध्ये (New CDC Guideline) सुधारणा करत 6 फूट अंतर सुरक्षित नसल्याचं सांगितलं. सीडीसी ही अमेरिकेची प्रसिद्ध संस्था असून ती साथीरोग आणि इतर गंभीर आजारांवर संशोधन करते. त्यांचं संशोधन जगभरात महत्त्वाचं मानलं जातंय. याच संस्थेने कोरोनाबाबतच्या फिजीकल डिस्टन्सिंगच्या अंतरात बदल केल्यानं आता अधिक काळजी घेणं आवश्यक आहे (New CDC Guidelines on Airborn Virus Aerosol Remains suspended in the Air).

आधी असं म्हटलं जात होतं की कोरोनाचा अधिकाधिक संसर्ग हा जवळच्या लोकांकडून (Close Contact) आणि पृष्ठभागाला स्पर्श (Surface Transmission) केल्यानं होतो. मात्र. सीडीसीच्या नव्या संशोधनानुसार, हवेत पसरलेले कोरोना विषाणू (Airborn Virus) 1 मीटर अंतरापर्यंत संसर्ग करु शकतो. हवेतील हा विषाणू ‘मिस्ट पार्टिकल’ म्हणजेच नाकातून शिंकेसोबत बाहेर पडलेल्या द्रवाच्या रुपात पसरतात. शिंक किंवा बोलताना जेव्हा थुंकी किंवा नाकातील द्रावाच्या माध्यमातून हे विषाणू हवेत पसरतात तेव्हा हा संसर्गाचा धोका अधिक वाढतो. कारण या रुपातील कोरोना विषाणू बराचवेळी हवेत तरंगत राहतो.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचं मुख्य कारण ‘रेस्पिरेट्री फ्लूड’

सीडीसीने केलेल्या संशोधनानुसार, कोरोना विषाणू रेस्पिरेट्री फ्लूडमध्ये म्हणजेच लाळ, थुंकी किंवा नाकातील द्रवात अधिक संसर्ग करणारा कोरोना विषाणू असतो. त्यामुळे हेच संसर्गाचं मुख्य कारण आहे. चार भिंतीत बंद आणि कोंदटलेल्या ठिकाणी हे विषाणू सुक्ष्म पार्टिकलच्या रुपात खूप जास्त वेळ तरंगतात (Aerosol Remains Suspended In The Air For Longer Period Of Time) आणि 1 मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत प्रवास करत संसर्ग करतात. म्हणूनच सीडीसीच्या गाईडलाईन्स घरातही कुटुंबातील सदस्यांनी मास्कचा वापर करत सुरक्षित अंतरावरुन बोलण्यास सूचवते. याशिवाय घरात हवा खेळती ठेवण्यासही सांगण्यात आलेय.

सीडीसीच्या नव्या गाईडलाईन्सचं महत्त्व

सीडीसीने आधी एरोसॉल ट्रान्समिशन थेअरीला अधिक महत्त्व दिलं नव्हतं. मात्र, नव्याने झालेल्या संशोधनातून कोरोना नियमांचं स्वरुपच बदलणार आहे. यानुसार आता कुटुंबातील सदस्यांनी विशिष्ट अंतरा पाळत शक्यतो घराबाहेर भेटणंच अधिक योग्य होईल. जे लोक मोकळ्या वातावरणात राहत नाहीत त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं आहे.

या नव्या संशोधनानंतर अमेरिकाच नाही तर जगाचा विचार आणि वर्तन बदलणार आहे. संशोधक आधी कोरोना विषाणूला त्याचा मोठा आकार आणि 6 फुटापर्यंतही प्रवास करु शकत नसल्यानं जाडा विषाणू म्हणायचे. मात्र, या विषाणूने म्युटंट करुन आपलं रुप आणि क्षमता बदलल्या आहेत. आता हा विषाणू बराच वेळ हवेत तरंगू शकतो आणि 1 मीटरपर्यंत प्रवास करु शकतो. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढाईचे नियम बदलणं खूप महत्त्वाचं झालंय. सीडीसीने देखील याबाबत गंभीर इशारा दिलाय.

हेही वाचा :

धक्कादायक, “पेशंट वाचवायचाय? मग व्हेंटिलेटरसाठी दीड लाख द्या”, सांगलीतील रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट, रुग्णांचे गंभीर आरोप

भाजप कार्यकर्त्यांचा कोविड हॉस्पिटलमध्ये राडा, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली

‘आम्हाला नवा भारत नको’, सोशल मीडियावर #NoMoreModi ट्रेंडिंगवर, वाढत्या कोरोनामुळे लोक भडकले

व्हिडीओ पाहा :

New CDC Guidelines on Airborn Virus Aerosol Remains suspended in the Air