AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुणांची खाण आहे स्वयंपाकघरातील हा पदार्थ, मधुमेहासह अनेक समस्यांवर ठरतो गुणकारी; तुम्हीही करता का त्याचे सेवन?

मसाल्याच्या स्वरूपात वापरलं जाणारं जिरं आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत जिरे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

गुणांची खाण आहे स्वयंपाकघरातील हा पदार्थ, मधुमेहासह अनेक समस्यांवर ठरतो गुणकारी; तुम्हीही करता का त्याचे सेवन?
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 03, 2023 | 3:25 PM
Share

नवी दिल्ली – जेवणात वापरण्यात येणारे मसाले आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच शिवाय आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून (health problems) दूर ठेवतात. भारतीय स्वयंपाकात जवळपास प्रत्येक पदार्थांमध्ये वापरलं जाणारं जिरंही (cumin) या मसाल्यांपैकी एक आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही जिरं गुणकारी आहे. अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं जिरं खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. जिर्‍याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म तर सुधारतोच, शिवाय पचनाच्या अनेक समस्यांपासूनही सुटका मिळते. त्याचे आणखी काय फायदे (benefits of cumin seeds) आहेत ते जाणून घेऊया..

वजन कमी करण्यास गुणकारी

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि तुम्हाला वजन लवकर कमी करायचे असेल तर त्यासाठी जिरं खूप फायदेशीर ठरेल. एक ग्लास कोमट पाण्यात भाजलेले जिरं, मध आणि लिंबू मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा पावडरही वापरू शकता. लठ्ठपणामुळे घाम येण्याच्या समस्येपासूनही जिरे खाल्ल्याने आराम मिळतो.

बुद्धी होते तीक्ष्ण

जर तुम्हाला तीक्ष्ण बुद्धी हवी असेल तर त्यासाठीही तुम्ही जिऱ्याचे सेवन करू शकता. रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6, झेक्सॅन्थिन, नियासिन, यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे जिऱ्यामध्ये भरपूर असतात व ती मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती तर वाढतेच पण मानसिक आरोग्यही सुधारते. जिरं रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यावे व जिरं चावून खावे.

पचनाच्या समस्यांवर गुणकारी

जर तुम्ही पचनाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर तेही जिरं खूप प्रभावी ठरेल. जिऱ्यामध्ये असलेले थायमॉल आणि आवश्यक तेल पचन सुलभ करतात. यासोबतच हे अन्न लवकर पचण्यासही मदत करते. इतकंच नाही तर मेटाबॉलिज्मला गती देऊन बद्धकोष्ठतेची समस्याही टाळते. सकाळी रिकाम्या पोटी जिरं जरूर खावं.

त्वचा रोग दूर होतील

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता. मुरुमं, पिंपल्स, डाग यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यासाठी भाजलेले जिरं फायदेशीर ठरेल. भाजलेल्या जिऱ्याच्या पावडरची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने या समस्यांपासून आराम मिळेल. यासोबतच चेहऱ्याची चमक आणि घट्टपणाही वाढेल.

मधुमेहात फायदेशीर

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी जिरं खूप प्रभावी ठरेल. काही संशोधनात असे समोर आले आहे की जिरं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. भाजलेल्या जिऱ्याची सात ते आठ चमचे पावडर दिवसातून दोनदा खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.