9 महिने नाही, फक्त पाच दिवसात दोनदा महिलेची डिलिव्हरी, ऐकून चमत्कार वाटला ना? पण गोष्ट आहे खरी…

काराने पुढे सांगितले की, दोन्ही गर्भामध्ये फक्त 5 दिवसांचे अंतर होते. वैद्यकीय भाषेमध्ये याला सुपरफेटेशन स्थिती म्हटंले जाते. गर्भधारणेच्या काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यांत जेव्हा एखाद्या स्त्रीच्या अंड्यामध्ये शुक्राणू प्रवेश करतो, तेव्हा त्यावेळी स्त्रीला दुसरी गर्भधारणा होते. गर्भधारणेनंतर महिलेच्या शरीरात हार्मोनमध्ये मोठे बदल होतात. त्यामुळे या काळात पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता तशी खूप कमीच असते.

9 महिने नाही, फक्त पाच दिवसात दोनदा महिलेची डिलिव्हरी, ऐकून चमत्कार वाटला ना? पण गोष्ट आहे खरी...
Image Credit source: whatsnew2day.com
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 4:59 PM

अमेरिकेमध्ये (America) राहणारी 25 वर्षीय कारा विनहोल्डने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेतील टेक्सास शहरामध्ये कारा वास्तव्यास असून काराची चक्क 5 दिवसांमध्ये दोनदा डिलिव्हरी (Delivery) झाली असून दोन्ही वेळेला तीने मुलांना जन्म दिला आहे. हे ऐकून कानावर विश्वास बसत नाहीये ना? मात्र, ही सत्य घटना आहे. काराच्या म्हणण्यानुसार, ती गर्भधारणेचा प्लान करत होती, परंतु तिला समजले की तिने दुसऱ्यांदा गर्भधारणा केली आहे. त्यामुळे असे झाले की, एकदा गर्भवती (Pregnant) असूनही काराने दुसऱ्यांदा गर्भधारणा केली. मात्र, काराच्या पोटातील दोन्ही गर्भ हे वेगवेगळे होते, म्हणजेच तिला जुळी बाळ नव्हती.

दोन्ही गर्भामध्ये फक्त 5 दिवसांचे अंतर

काराने पुढे सांगितले की, दोन्ही गर्भामध्ये फक्त 5 दिवसांचे अंतर होते. वैद्यकीय भाषेमध्ये याला सुपरफेटेशन स्थिती म्हटंले जाते. गर्भधारणेच्या काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यांत जेव्हा एखाद्या स्त्रीच्या अंड्यामध्ये शुक्राणू प्रवेश करतो, तेव्हा त्यावेळी स्त्रीला दुसरी गर्भधारणा होते. गर्भधारणेनंतर महिलेच्या शरीरात हार्मोनमध्ये मोठे बदल होतात. त्यामुळे या काळात पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता तशी खूप कमीच असते. सुपरफेटेशनमध्ये एक अतिविकसित आणि दुसरे मागे पडण्याची शक्यता असते. अशावेळी प्रसूतीनंतर दुसऱ्या बाळाला बरेच दिवस पोटात ठेवले जाते किंवा सोबत प्रसूती केली जाते. सुपरफीटेशन स्थिती मानवामध्ये फार कमी प्रमाणामध्ये दिसते. पण प्राण्यांमध्ये याची संख्या लक्षणीय आहे.

हे सुद्धा वाचा

2019 मध्ये झाला होता गर्भपात

गर्भवती महिला पुन्हा गरोदर राहिली तर गर्भातील दोन्ही मुले एकाच वेळी जन्माला येतात. परंतू त्यांचा विकास कमी जास्त होतो आणि त्यांच्या वयामध्येही फरक पडतो. यामुळेच विकास झालेल्या पहिल्या गर्भाची प्रसूती ही अगोदर केली जाते, त्यानंतर दुसऱ्या गर्भाची. कारा आणि तिचा नवरा ब्लेक त्यांच्या मुलांच्या जन्मापासून खूप आनंदी आहेत. काराने सांगितले की, 2019 मध्ये तिचा गर्भपात झाला होता. त्यानंतर आता त्यांना दोन मुले झाल्यामुळे खूप आनंदी आहे. कारा पुढे म्हणाली की, दोघंही एकसारखे दिसतात. बऱ्याच लोकांना तर हे जुळेच असल्याचे वाटते. तसेच मलाही सुरूवातीला वाटले होते की, मी जुळ्याच मुलांना जन्म देते आहे. पण नंतर याबद्दल डाॅक्टरांनी सविस्तरपणे माहिती सांगितली.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.