Diabetes symptoms : डायबेटीजची ही लक्षण लघवीत दिसतात, व्हा सावधान

आपले बदलते राहणीमान आणि आहारामुळे डायबेटीज हा आजार बळावत आहे. तुमच्या युरीनमध्ये जरी ही लक्षणे आढळली तर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्यायला हवी..

Diabetes symptoms : डायबेटीजची ही लक्षण लघवीत दिसतात, व्हा सावधान
URIN AND Diabetes Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 7:20 PM

मुंबई : डायबिटीज म्हणजे मधूमेह ( Diabetes ) एक असा आजार आहे ज्याचे प्रमाणात भारतात प्रचंड वाढत आहे. बैठी जीवनशैली व्यायामाचा अभावाने डायबेटीझचे प्रमाण वाढत आहे. माणसाच्या रक्तात साखरेचे प्रमाण अधिक वाढल्यास डायबिटीज वाढतो. स्वादूपिंडात तयार होणारे इन्सुलिन ( insulin ) हे हार्मोन्स जेवनातील ग्लुकोज वेगळे करून पेशींना ऊर्जा पुरविते. परंतू आवश्यकतेनूसार इन्सुलिन तयार न झाल्यास हे ग्लुकोज रक्तातच राहते पेशींपर्यंत पोहचत नाही. आणि रक्तात साखर (SUGAR LEVEL ) वाढते असे आपण म्हणतो. डायबेटीजने हृदयरोग, स्ट्रोक, किडनी आणि डोळ्यांचे आजार वाढतात. diabetes.co.uk ने दिलेल्या माहीती प्रमाणे लघवीत ही लक्षणे आढळली तर त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांनी भेटायला हवे…

diabetes.co.uk या मेडीकल वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार ज्या लोकांना अधिक लघवीला येते, किंवा वारंवार लघवीला जावे लागते. त्या लोकांना टाइप 1 आणि 2 डायबिटीजचा धोका वाढतो. ज्या लोकांना दिवसातून तीन लिटरपेक्षा जास्त लघवी होते. त्यांना डायबेटीक आजाराचा धोका वाढ शकतो. सारखे लघवीला झाल्याने शरीरातील पाणी कमी होते. किडनीचे प्रेशर वाढते. रक्तातील शुगर प्रमाणाच्या बाहेर पडल्याने किडनीतून शुगर पुन्हा शरीरात न जाता ती रक्तातून बाहेर येते. जर शुगर जास्त असेल तर किडनीद्वारे रक्तातील साखर वेगळी केली जाते आणि अधिक पाणी फिल्टर होते आणि लघवीचे प्रमाण वाढते.

शुगर कमी करण्याचा उपाय

एका अभ्यासात असे आढळले की जेवल्यानंतर दोन ते पाच मिनिटे चालण्याचा हलका व्यायाम केल्याने शुगरचे प्रमाण कमी होत असते. दोन गट करण्यात आले एका गटाला जेवणानंतर चालण्याची क्रिया करायला सांगितली तर दुसऱ्याला बसुन राहायला सांगितले. बसुन राहणाऱ्या गटाची शुगर लेव्हल वाढलेली होती. तसेच दर अर्धा तासाने दोन ते पाच मिनिट चालणाऱ्यांची शुगर खूपच कमी झाली होती. तसेच बसणे किंवा उभे राहण्याच्या तुलनेत जेवल्यानंतर चालणाऱ्यांची ब्लड शुगर कमी झाली होती.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.