थंडीच्या दिवसांमध्ये रात्री स्वेटर घालून झोपणे पडू शकते महागात, जाणून घ्या नेमकं कारण आणि उपाय

साधारणत: थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम कपडे घालून झोपण्यास प्राधान्य देत असतात. यातून थंडीपासून सुटका तर होते; परंतु, यातून आरोग्याला अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वेटर वा तत्सम कपडे घालून झोपल्याने आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

थंडीच्या दिवसांमध्ये रात्री स्वेटर घालून झोपणे पडू शकते महागात, जाणून घ्या नेमकं कारण आणि उपाय
WEATHER COLD

साधारणत: थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम कपडे घालून झोपण्यास प्राधान्य देत असतात. यातून थंडीपासून सुटका तर होते; परंतु, यातून आरोग्याला अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वेटर वा तत्सम कपडे घालून झोपल्याने आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हे त्या कपड्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. उनी (लोकर पासून तयार कपडे) हे उष्माचे सहचालक असतात. या कपड्यांच्या रेशांमधील पोकळीतून हवा धरुन ठेवली जात असल्याने शरीरात निर्माण होणारी गर्मी आतच राहते. यातून आपले थंडीपासून संरक्षण होत असते. परंतु याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होउ शकतो.

गरम कपडे घालून झोपणे आहे घातक

थंडीत शरीराचा रक्तवाहिनी आकुंचन पावतात. उनी कपडे घालून झोपल्यामुळे गारठ्यापासून संरक्षण तर मिळते परंतु शरीरातील गर्मी बाहेर पडत नाही. त्यामुळे बेचेनी, रक्तदाब वाढण्याची समस्या निर्माण होउ शकते.

ऍलर्जीची समस्या

या लक्षणांना पाहून तुम्हाला गरम कपड्यांपासून ऍलर्जी तर नाही… खाज सुटणे, त्वचेवर वळखण पडणे, डोळ्यांत आग होणे, नाक वाहणे, खोलका, अशी लक्षण असतील तरी तुम्ही करम कपड्यांपासून लांब राहनेच योग्य.

रात्रीची झोप होते खराब

चांगल्या झोपेसाठी शरीरातील तापमान संतुलित असणं महत्वाचे असते. परंतु गरम कपडे घातल्याने तस होत नाही. स्वेटर वा तत्सम गरम कपड्यांनी शरीरातील तापमान आतच राहते. यातून रात्री झोपताना बेचेन होउ शकते.

मधुमेही व ह्दयरोगींना आहे घातक

स्वेटर सारख्या गरम कपड्यांवरी रेशा इतर कपड्यांच्या तुलनेत जाड असतात. त्यांच्यात अनेक हवेची कप्पे असतात जे एका विद्युतरोधकासारखे काम करतात. हिवाळ्यात आपण स्वेटर घालून झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील तापमान वाढून जाते. हे वाढलेले तापमान मधुमेही व ह्दयरोगींसाठी धोकादायक ठरु शकते.

शरीरावरील ओरखडेही होऊ शकतात

उन्हाळ्याच्या दिवसांसारखे हिवाळ्यातही घाम येत असतो, परंतु गारठ्यात त्याची फार जाणीव होत नसते. स्वेटमध्ये घाम बाहेर पडत नाही. यातून संपूर्ण शरीरात इन्फेक्शन होण्याचा धोका असतो, बाहेरी हवा आत येत नसल्याने अंगावरी घाम जसाच्या तसा राहतो व बहुधा यातून शरीरावर ओरखडेही निर्माण होण्याची शक्यता असते.

शरीराच्या तापमानाला बाधा

स्वेटर घातल्यानंतर आपल्या शरीरातील बाहेरील तापमान तर कमी होते परंतु आतील तापमाचे संतुलन राखले जात नाही. रात्री झोपताना शरीरातील तापमान कमी व्हायला हव, परंतु स्वेटर घालून झोपल्याने शरीरातील तापमान रात्रभर वाढलेल असत.

पायातील मोजेही ठरु शकतात घातक

उनी कपड्यांमध्ये थर्मल इन्सुलेशन चांगले असते परंतु ते घाम शोषू शकत नाहीत. यामुळे अनेक जिवाणू निर्माण होउ शकतात. त्यातून त्वचेसंबंधित अनेक समस्या निर्माण होउ शकतात. त्यामुळे सुती मोजे शरीरासाठी योग्य असतात. रात्री झोपताना उनी कपड्यांच्या मोज्याऐवजी सुती मोजे अधिक चांगले ठरु शकतात.

तरीही स्वेटर घालून झोपण्याला प्राधान्य

उनी कपड्या घालण्याअगोदर सुती वा रेशम कपडे घालावे, त्वचेला नितळ ठेवण्यासाठी एखादी क्रीम लावून मग त्यावर स्वेटर घालावे, जाड स्वेटर घालण्यापेक्षा हलक्या वजनाचे स्वेटर घालावे.

इतर बातम्या:

Viral Video | अशी BMW कार कधी पाहिलीत का, नेटकरी हसून हसून लोटपोट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Mission 100 police | नागपूर पोलीस भरती घोटाळ्यात मिशन 100!; कसे बनविणार होते बेरोजगारांना शिपाई?

Published On - 7:40 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI