AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना या 8 पदार्थांपासून ठेवा लांब; नाहीतर होईल पश्चात्ताप

उन्हाळ्यात मुलांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लवकरच डिहायड्रेशन आणि पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे मुलांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना या काही खाद्यपदार्थांपासून आणि पेयांपासून दूर ठेवा. चला तर मग जाणून घेऊयात कोणते पदार्थ आणि पेयं मुलांना देणे टाळले पाहिजे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना या 8 पदार्थांपासून ठेवा लांब; नाहीतर होईल पश्चात्ताप
children ice cream
| Edited By: | Updated on: May 05, 2026 | 3:18 PM
Share

उन्हाळा हा मुलांसाठी आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण करतो. कारण या कडक उन्‍हाळ्यात लहान मुलांच्या शरीरातील पाणी लवकर कमी होते आणि त्यांची पचनसंस्था कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपल्या मुलांच्या खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणा सुद्धा एक मोठी समस्या बनू शकतो. अनेकदा पालक नकळतपणे आपल्या मुलांना असे पदार्थ खाऊ घालतात जे उन्हाळ्यात त्यांच्यासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे या ऋतूत मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आणि काही विशिष्ट पदार्थ खायला न देणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांना कोणत्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

1. आईस्क्रीम आणि खूप थंड पदार्थ

उन्हाळ्यात मुलांना आईस्क्रीम खूप आवडते , पण अतिथंड पदार्थांमुळे घशाचा संसर्ग आणि सर्दी-खोकला होऊ शकतो. यामुळे मुलांची प्रतिकारशक्तीसुद्धा कमकुवत होऊ शकते. त्यामुळ मुलांना आईस्क्रीम आणि खूप थंड पदार्थांपासून कसे दूर ठेवता येईल याकडे लक्ष द्या.

2. थंड पेये आणि सोडा

थंड पेयांमध्ये साखर आणि केमिकलचा प्रमाण जास्त असते. त्यामुळे असे काही थंड पेयं असतात जे प्यायल्याने शरीर हायड्रेट न ठेवता उलट डिहायड्रेशन वाढवू शकतात. मुलांसाठी हा एक अनहेल्दी पर्याय आहे.

3. तळलेले पदार्थ

पकोडे, चिप्स आणि समोसे यांसारखे तळलेले पदार्थ‍ कडक उष्णतेत खाणे टाळले पाहिजे. कारण ते पचायला जड जातात आणि त्यामुळे पोटदुखी किंवा गॅस होऊ शकतो.

4. खूप जास्त मसालेदार पदार्थ खाणे

मसालेदार पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते. मुलांना जास्त मसालेदार पदार्थ दिल्यास त्यांच्या पोटात जळजळ आणि अस्वस्थता होऊ शकते.

5. शिळे अन्न

उन्हाळ्याच्या उष्णतेत अन्न लवकर खराब होते. शिळे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो, जो मुलांसाठी गंभीर ठरू शकतो.

6. पॅकबंद ज्यूस

बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये खऱ्या फळांचे प्रमाण कमी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

7. फास्ट फूड

बर्गर, पिझ्झा आणि नूडल्स हे आजकालच्या मुलांमध्ये लोकप्रिय आहेत, पण त्यांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते. या तीव्र उष्णतेत हे पदार्थ शरीराला अधिक नुकसान पोहोचवू शकतात.

8. खूप जास्त गोड पदार्थ

जास्त गोड पदार्थ आणि चॉकलेट खाल्ल्याने मुलांना सुस्ती येऊ शकते आणि त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते. यामुळे मुलांना भूकही कमी लागते. त्यामुळे मुलांना कडक उन्हाळ्यात जास्त गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

काय खायला द्यावे?

उन्हाळ्यात मुलांना क‍लिंग, काकडी, दही, ताक आणि नारळाचे पाणी देणे उत्तम असते. ताजे हलके आणि घरगुती अन्न तुमच्या मुलांच्या शरीराला थंडावा देते व निरोगी ठेवते.

उन्हाळ्यात योग्य आहार घेणे हा मुलांना आजारांपासून वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे हे पदार्थ टाळा आणि आरोग्यदायी पर्यायांची निवड करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?