AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण अनेक हेल्दी आणि निरोगी आहार घेत असतो. पण कधी कधी अशा काही पदार्थांबद्दल माहित नसते ज्याच्या एकत्र सेवनाने आपल्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते. कारण काही पदार्थांचे सेवन एकत्र केल्यास ते पचनक्रियेसाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी आजच्या या लेखात आपण आयुर्वेदानुसार असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचे एकत्र सेवन केले नाही पाहिजे ते जाणून घेऊयात...

आयुर्वेदानुसार चुकूनही 'या' 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
| Edited By: | Updated on: Jun 06, 2025 | 2:10 PM
Share

आयुर्वेदात अन्नाला खूप महत्व आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. बऱ्याचदा चवीच्या हव्यासापोटी आपण काही पदार्थांचे सेवन एकत्र करून करतो, ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो आणि हळूहळू शरीराला गंभीर परिणाम होतात. आयुर्वेदात याला विरुद्ध आहार असे म्हणतात. अशातच आयुर्वेदानुसार तुम्ही तुमच्या आहारात कोणते पदार्थ एकत्र खाणे टाळावे आणि का हे जाणून घेणे महत्वाचे आहे? चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात…

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते, चुकीच्या फुड कॉम्बिनेशनचे सेवन केल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात जे पचन प्रक्रियेत अडथळा आणतात आणि अनेक आजारांना देखील कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला माहित असले पाहिजे की चुकूनही कोणतेही अन्न पदार्थ एकत्र खाऊ नयेत. जेणेकरून आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.

दूध आणि मीठ ही परस्परविरोधी आहार असल्याने एकमेकांना पूरक नसतात. कारण दूधाचे स्वरूप थंड आणि गोड असल्याने दुधाचे सेवन करताना मीठयुक्त पदार्थांचे सेवन एकत्र करू नये, चुकून या पदार्थांचे सेवन केल्यास त्यांच्या तुमच्या शरीरातील रक्त शुद्धीकरण आणि त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅलर्जी, त्वचारोग, पचनाचे विकार, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदात दूध आणि मासे यांचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण या पदार्थांचे स्वरूप वेगवेगळे आहेत. मासे हे उष्ण असते आणि दूध हे थंड असते. त्यामुळे त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात विष निर्माण होऊ शकते. यामुळे त्वचेचे आजार, ॲलर्जी आणि एक्झिमा देखील होऊ शकतो.

आपल्यापैकी प्रत्येकजण हे फळांचे स्मूदी आणि शेक बनवतात आणि पितात, परंतु आयुर्वेदानुसार फळं आणि दूध एकत्र खाऊ नयेत. विशेषतः आंबट फळे अजिबात खाऊ नयेत. आंबट फळे दुध यांचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात, ज्यामुळे गॅस, अपचन, आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र तुम्ही दुधासोबत आंबा किंवा केळीसारख्या गोड फळांचा मिल्कशेक बनवुन सेवन करू शकता.

बऱ्याचदा काही लोक पोटदुखी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध मिक्स करून पितात, जो एक विरोधाभासी आहार आहे. हो, आयुर्वेदात कोमट पाणी/चहा/दुधासोबत मध सेवन करू नये असे सांगतात. आयुर्वेदानुसार, मध कधीही गरम करू नये. गरम केल्यावर ते विषासारखे बनते, जे पचनसंस्थेवर परिणाम करते.

मधही तूपासोबत खाऊ नये. जर तूप आणि मध एकत्र करून समान प्रमाणात खाल्ले तर ते शरीरासाठी विषारी ठरू शकते. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात आणि असंतुलन निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, हे परस्परविरोधी पदार्थ खाणे टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.