AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनीर खाण्याचे फायदे तर खूप, पण त्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?

Paneer Side Effects : पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण त्याचे जास्त सेवन केल्यानेही समस्या निर्माण होऊ शकतात.

पनीर खाण्याचे फायदे तर खूप, पण त्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 24, 2023 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली : पनीर (Paneer) हे अनेकदा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. जे नॉनव्हेज खात नाहीत, ते पनीरचे भरपूर सेवन करतात. यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. याशिवाय पनीरमध्ये कॅल्शिअम (Calcium) , फॉस्फरस, सेलेनियम फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. याशिवाय इतरही अनेक फायदे (benefits) आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतके फायदे असूनही पनीर शरीराला हानी पोहोचवू शकते. पनीर खाण्याचे काही तोटेही (side effects of paneer) असतात. ते कोणते हेही जाणून घेऊया.

पनीर खाल्ल्यामुळे होणारे नुकसान :

  1. पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. परंतु शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास डायरियाची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच एकाच वेळी भरपूर पनीर खाऊ नये.
  2. पनीरमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. अशा परिस्थितीत, पनीरच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते.
  3. जे लोक लॅक्टोज इनटॉलरन्ट आहेत, त्यांना पनीरचे सेवन केल्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. पनीरमध्ये लॅक्टोस कमी प्रमाणात असले तरीही सावधगिरी म्हणून त्याचे कमी प्रमाणातच सेवन करावे.
  4. पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या पोटात सूज येऊ शकते. यामुळे छातीत जळजळ आणि ओटीपोटात तीव्र वेदना होणे, असा त्रास देखील होऊ शकतो. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो, जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
  5. पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्आस तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारातून पनीर दूर ठेवावे.
  6. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर पनीरचे जास्त सेवन करू नका, कारण त्याच्या सेवनामुळे तुमची बीपीची समस्या अधिक वाढू शकते.
  7. पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दूध पाश्चराइज्ड नसल्यास किंवा पनीर कच्चे खाल्ल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.