AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उष्णतेच्या लाटेपासून शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज प्या ‘हे’ हर्बल पेय

वाढती उष्णता आणि उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती उपाय सर्वात प्रभावी मानले जातात. म्हणूनच आज अशा एका पेयाबद्दल जाणून घेणार आहोत, जे या कडक उन्हाळ्यात सेवन केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. -

उष्णतेच्या लाटेपासून शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज प्या 'हे' हर्बल पेय
herbal drinks
| Edited By: | Updated on: May 22, 2026 | 11:30 PM
Share

भारताच्या बहुतांश मध्ये राज्यांमध्ये तसेच उष्णतेने हाहाकार माजवला आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंशांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे या काळात तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांचा सामना अनेकांना करावा लागणार आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम हा शरीरावर होतो, ज्याने शरीराचे तापमान लक्षणीयरीत्या वाढते. जेव्हा शरीरातील तापमान वाढते तेव्हा अनेकांना डिहायड्रेशनची समस्या आणि उष्माघाताचा धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते या काळात शरीर थंड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी घरगुती पेये सर्वात फायदेशीर मानली जातात.

विशेषतः आयुर्वेदात शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करणाऱ्या काही औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे. तर अशामध्ये काही घरांमध्ये वाळ्याचं सरबत बनवले जाते, जे उन्हाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तर वाळ्यामध्ये शीतलता देणारा गुणधर्म असतो आणि ते शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. या लेखात आपण वाळ्याचं सरबत कसे बनवायचे आणि त्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात .

पोषक तत्वांनी समृद्ध वाळ्याचं सरबत

वाळं ही एक हर्बल वनस्पती आहे जी वेटीव्हर नावाने ओळखली जाते. शरीराला थंडावा देणारे हे सरबत बनवण्यासाठी तिच्या मुळांचा वापर केला जातो. आयुर्वेद तज्ञ असेही सांगतात की तीव्र उष्णतेच्या काळात शरीराला थंडावा देण्यासाठी वाळ्यापासून बनवलेले पेय सर्वात फायदेशीर ठरते. तर या पेयाच्या पोषणमूल्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला उष्णतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. त्यात लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि काही आवश्यक खनिजे देखील असतात, जे उन्हाळ्याच्या दिवसात थकावा जाणवल्यास शरीरात ऊर्जा प्रदान करते आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते.

हर्बल वाळ्यापासून उन्हाळी पेय कसे बनवायचे?

वाळ्याच्या मुळ्या स्वच्छ पाण्यात हलक्या हाताने धुवा. आता ही मुळे एका पाण्याने भरलेल्या काचेच्या बाटलीत भिजत ठेवाव्यात. जेणेकरून त्यांचा रंग, सुंगध आणि गुणधर्म पाण्यात उतरतील. 3-4 तासांनंतर हे पाणी गाळून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात साखरेचा पाक तयार करा. हा पाक पुर्णपणे थंड झाल्यावर त्यात वाळ्याचे गाळलेलं पाणी मिक्स करा. चव वाढवण्यासाठी इच्छेनुसार थोडासा लिंबूरस मिक्स करा. हे वाळ्याचं सरबत तुम्ही दिवसातून फक्त एकदा प्यावे.

वाळ्याचे सरबत पिण्याचे फायदे

वाळ्याचं पेय केवळ शरीराला थंडावा देत नाही, तर त्याचे अनेक फायदेही आहेत. जसे की या सरबताच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला खाज सुटत असेल, पुरळ येत असेल किंवा मुरुमे येत असतील, तर यावर रामबाण उपाय म्हणून वाळ्याचं सरबत फायदेशीर ठरू शकते. हे पेय प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि जीवाणूनाशक म्हणून काम करते. त्याचा नैसर्गिक सुगंध तणाव कमी करण्यासाठी आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात नियमितपणे त्याचे सेवन केल्याने शरीर ताजेतवाने आणि सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने