AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Headphone मुळे कानांनाच नव्हे तर हृदयालाही पोहोचतो धोका, व्हा सावध!

हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज आपल्या कानाच्या पडद्याजवळ आदळतो. सर्वात गंभीर परिस्थितीमध्ये, कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते.

Headphone मुळे कानांनाच नव्हे तर हृदयालाही पोहोचतो धोका, व्हा सावध!
| Updated on: Nov 04, 2022 | 9:54 AM
Share

नवी दिल्ली – सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इअरफोन (headphone and earphone) हे आपल्या जीवनशैलीचा (lifestyle)अविभाज्य भाग बनले आहेत. काम करायचे असो किंवा निव्वळ गाणी ऐकत वेळ घालवायचा असेल अथवा प्रवास करताना मल्टिमीडिया कंटेंट पाहण्यासाठीही हेडफोनचा वापर केला जातो. तुम्हीही बराच काळ हेडफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. संगीत ऐकण्यासाठी काही वेळ हेडफोन वापरणे ठीक आहे, पण ते दीर्घकाळ वापरल्याने आपल्या कानांवर वाईट (bad effect on ears) परिणाम होतो. हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज आपल्या कानाच्या पडद्याजवळ आदळतो. त्याच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याचे नुकसानही होऊ शकते.

इअरफोनच्या वापरामुळे काय नुकसान होते व त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊया.

– गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास (त्या) व्यक्तीचे कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात. यामुळे बहिरेपणाचा धोकाही संभवतो.

– डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. आपल्या कानांची श्रवण क्षमता केवळ 90 डेसिबल असते, जी हळूहळू 40-50 डेसिबलपर्यंत कमी होत जाते.

– हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच, पण त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे कर्करोगाचा धोका देखील वाढतो.

– ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना तुम्ही तुमचे इअरफोन्स एकमेकांशी शेअर करत असाल तर तसे करणे टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो.

कसा करावा बचाव?

तुम्हालाही कानाला होणारा त्रास टाळायचा असेल, तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा. दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.