Expired Medicine : घरातील राहून गेलेली औषधं कचऱ्यात टाकत असाल तर थांबा, कारण… एकदा ही बातमी वाचा!
लोक औषध कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की ही औषधे फेकून देण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत.

Health : अनेक वेळा घरातील साफसफाई करताना आपल्याला अनेक जुनी एक्सपायरी डेट संपलेली औषधे सापडतात. या औषधांची आपल्याला गरजही नसते किंवा त्याचा कसलाही फायदा नसतो त्यामुळे लोक असे औषध कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की ही औषधे फेकून देण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार एक्सपायरी डेट संपलेली औषधं मॅन्युफॅक्चररकडे परत पाठवणे हा सर्वात चांगला मार्ग आहे.
एका ऑनलाईन रिपोर्टनुसार, काही औषधं अशी आहेत जी FDA ने फ्लश लिस्ट मध्ये टाकली आहेत जी मेपेरिडी, हायड्रोकोडोन हायड्रोमॉर्फोन, बुप्रेनॉर्फिन आणि फेंटॅनिल आहेत. पण आपल्याला सर्व प्रकारची औषधे फ्लश करता येत नाहीत कारण पाण्यात मिसळलेली अशी अनेक औषधे आहेत जी लोकांवर वाईट परिणाम करू शकतात. तसेच ही औषधे पर्यावरणासाठी देखील घातक ठरू शकतात. त्यामुळे ही औषधे पहिल्यांदा पॅकेट मधून काढून टाका त्यानंतर ती बारीक करून मातीत किंवा केरात मिसळा त्यानंतर ते सगळं एका प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून ते कचऱ्यात फेकून द्या.
ज्यावेळी आपण एक्सपायरी डेट संपलेली औषधं फेकून देतो तेव्हा त्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. कारण ती औषधं कुत्रा, मांजर किंवा इतर अन्य कोणतेही प्राणी खाऊ शकतात त्यामुळे अशी औषधं फेकून देऊ नका. या औषधांमुळे प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला तुमच्या घरी एक्सपायरी डेट झालेले औषध सापडले तर ते फेकून देण्यासाठी वरील नियमांचे पालन करा. यामुळे तुम्ही प्राणी आणि पर्यावरण सुरक्षित ठेवू शकाल.
