AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glowing Skin: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ‘हा’ उपाय केल्यास अनेक समस्यांपासून मिळेल आराम…

Skincare Tips: व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि कोरफड जेल दोन्ही तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि कोरफड जेल एकत्र चेहऱ्यावर वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी तुमच्या त्वचेची काळजी कोणत्या पद्धतीनं घ्यावी? व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि कोरफड जेल कसे वापरावे?

Glowing Skin: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर 'हा' उपाय केल्यास अनेक समस्यांपासून मिळेल आराम...
| Edited By: | Updated on: Jan 28, 2025 | 3:28 PM
Share

आपल्या सर्वांना सुंदर दिसायचं असते. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रयोग केले जातात. सुंदर आणि निस्तेज त्वचेससाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु मार्केटमधील क्रिम्समधील रसायनिक पदार्थांमुळे तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होते. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे रसायनिक प्रोक्ट्ससचा वापर केल्यामुळे पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि त्वचा कोरडी होण्यास सुरूवात होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण नैसर्गिक पदार्थांचा उपयोग करण्यास पसंती देतात.

अनेकजण व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:कडे दुर्लक्ष करतात. आरोग्य आणि त्वचेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. आजकल अनेकजण घरच्याघरी स्किनकेअर करताना दिसतात. घरच्या घरी नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी तुम्ही व्हिटॅमिन -ई कॅप्सूलचा वापर करू शकता. त्यासोबतच त्वचेला मॉईश्चरायझ करण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. व्हिटॅमिन -ई कॅप्सूल आणि कोरफड जेल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात.

व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचे फायदे :- व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात ज्ययामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचा त्वचेवर वापर केल्यामुळे त्वचा रॅडिकल्सपासून मुक्त होण्यास मदत होते. त्वचेवर रॅडिकल्स असल्यामुळे त्यावर सुरकुत्या दिसून येतात. व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा मॉईश्चरायझ आणि हायड्रेट करण्यास मदत करते. व्हिटॅमिन-ई कॅप्सूलच्या वापरामुळे तुम्हाला जर सोरायसिस सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेल तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायझ करते विशेषत: तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करू शकता. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोरफड जेलच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते आणि चेहऱ्यावरील काळे डाग आणि डोळ्याखालचे काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.

कोरफड जेलचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत करते. कोरफड जेलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील जळजळ कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ईच्या वापरामुळे पिग्मेंटेशनच्या समस्या दूर होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई आणि कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई आणि कोरफड जेलचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे पिंपल्स सारख्या समस्या दूर राहाण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई आणि कोरफड जेल लावल्यामुळे चाहऱ्यावरील मुरूमांची डाग कमी होण्यास मदत होते.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा :

व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि कोरफड जेल वापरण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला कोरफड जेल किंवा व्हिटॅमिन-ई कॅप्सूलची ऍलर्जी असेल तर वापरणं टाळा. तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.