Natural Hair Care Tips: कमी वयामध्ये केस पांढरे का होतात? जाणून घ्या निरोगी केसांसाठी नेमकं काय करावे?
Hair Care Tips: आजकाल अगदी कमी वयामध्ये केस पांढरे होतात. केस पांढरे होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरामधील असंतुलित हार्मोन्स. चुकिच्या आहारामुळे आणि मानसिक तणावामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. चला तर जाणून घेऊया पांढरे केस घरच्या घरी काळे कसे करावे? जाणून घ्या सेप्या पद्धतीनं केसांचे आरोग्य निरोगी कसे करू शकता.

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे शरीरामध्ये हार्मोनल बदल पाहायला मिळतात. शरीरातील हार्मोनल बदलामुळे केस पाढरे होण्याची समस्या वढली आहे. आजकाल तरूणांमध्य पांधऱ्या केसांची समसया पाहायला मिळतात. पांढऱ्या केसांमुळे केसांचे सैंदर्य निधून जाते. अनेक शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये देखील पांढऱ्या केलांती समस्या दिसून येते. केस नेमकं पांढरे का होतात त्याचे कारण शोधण्या ऐकजी अनेकजण केस रंगवण्याच्या मागे लागतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? केसांला रंगवल्यामुळे तुमचे केस अधिक ड्राय आणि खराब होतात.
पांढरे केस काळे करण्यासााठी अनेकजण केसांवर रंग लावतात. परंतु त्या रंगामध्ये भरपूर प्रमाणात रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. रसायनिक पदार्थांमुळे तुमच्या केसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हेअर कलरच्या वापरामुळे तुम्हाला केसगळती आणि केसांमध्ये कोड्याच्या समस्या उद्भवू शकतात. निरोगी आणि काळे भोर केसांसाठी काही विशेष गोष्टी केल्यास फायदेशीर ठरेल. केसांची विशेष पद्धतीनं काळजी केल्यामुळे केस गळतीची समस्या होतील दूर.
धुम्रपान केल्यामुळे फक्त कर्करोगा सारख्या समस्या होत नाही तर धुम्रपान केल्यामुळे तुमच्या केसांच्या आरोग्यवर देखील गंभीर परिणाम होतो. सिग्रेट प्यायल्यामुळे तुमची केस पांढरी होतात. अभ्यासानुसार, धुम्रपान केल्यामुळे तुमचे केस पांधरे होतात आणि केसांमध्ये कोंड्याची समस्या होते. त्यामुळे तुम्हाला जर धुम्रपान करण्याची सवय असेल तर तुम्ही आजच सोडा. धुम्रपान केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण कमी होतो ज्यामुळे केसांना पुरेसा पोषण मिळत नाही आणि केस पांढरे होऊ लागतात.
नियमित योगा नाही केल्यामुळे आणि व्यायाम नाही केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. व्यायाम नाही केल्यामुळे तुमच्या डोक्यातील ताण वाढतो. जेव्हा आपण योगा किंवा इतर कोणत्याही शारीरिक हालचालीं करत नाही तेव्हा म्हातारपण लवकर येऊ लागते आणि त्याचा आपल्या केसांवरही परिणाम होतो. जास्त मानसिक तणाव घेतल्यामुळे केसांमध्ये पुरेसा रक्तपुरवठा होत नाही ज्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. नियमित योगा केल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव दूर होण्यास मदत होते ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांना अधिक पोषण मिळते ज्यामुळे ते निरोगी राहातात.
केस पांढरे होण्याचे एक कारण म्हणजे आहारामध्ये पोषणाची कमी. जेव्हा तुम्ही पुरेसे फळे, भाज्या आणि प्रथिने खात नाही, तेव्हा तुमच्या केसांना आवश्यक पोषक तत्वे मिळवत नाहीत, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि लवकर पांढरे होतात त्यासोबतच केस गळतीची समस्या होते. म्हणून, तुमच्या आहारात ओमेगा ३ आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाऊ नका.
केसांची योग्य वाढ होण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणे गरजेचे असते. जर तुम्ही व्यवस्थित केस धुतले नाही तर तुमच्या टाळूवर घाण साचून राहाते ज्यामुळे टाळूवरील छिद्र बंद होतात आणि केसांची वाढ होत नाही आणि केस कमकुवत होतात. तसेच, जर तुम्ही दररोज केस धुतले तर ते टाळूतील नैसर्गिक तेल देखील काढून टाकते आणि केस कोरडे आणि निर्जीव होतात. म्हणून, आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच केस धुवावेत.