Health Tips: सुखाची झोप हवीय?, झोपण्यापूर्वी ‘ही’ कामं करा; औषधांचीही गरज पडणार नाही!

खराब जीवनशैली आणि अन्न हेल्दी खाण्याच्या सवयींमुळे आपल्याला बऱ्याच वेळा झोप न लागण्याची समस्या निर्माण होते. यामुळे दुसऱ्या दिवशी थकल्यासारखे वाटते. तसेच दिवसभर आळस येतो आणि कोणतेही काम करावे वाटत नाही. कधीकधी जास्त ताणामुळे झोप येत नाही.

Health Tips: सुखाची झोप हवीय?, झोपण्यापूर्वी 'ही' कामं करा; औषधांचीही गरज पडणार नाही!
चांगली झोप

मुंबई : खराब जीवनशैली आणि अन्न हेल्दी खाण्याच्या सवयींमुळे आपल्याला बऱ्याच वेळा झोप न लागण्याची समस्या निर्माण होते. यामुळे दुसऱ्या दिवशी थकल्यासारखे वाटते. तसेच दिवसभर आळस येतो आणि कोणतेही काम करावे वाटत नाही. कधीकधी जास्त ताणामुळे झोप येत नाही. अशा स्थितीत काही लोक झोपेसाठी औषधांची मदत घेतात. (Follow these tips to get a good night’s sleep)

जेणेकरून त्यांच्या शरीराला दुसऱ्या दिवशी सकाळी काम करण्याची ऊर्जा मिळेल. पण तुम्हाला माहिती आहे का की ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक असतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध घेऊ नका. जर तुम्हालाही रात्री नीट झोप येत नसेल, तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे झोप येण्यास तुम्हाला नक्की मदत मिळेल.

मोबाईल दूर ठेवा

बहुतेक लोक आपला जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. याशिवाय त्यांच्यातून बाहेर पडणारा ब्लू-रे आरोग्यासाठी हानिकारक असतात. तज्ञांच्या मते, तुम्ही स्क्रीनपासून दूर असता तेव्हा मेलाटोनिन हार्मोन बाहेर पडतो. हे संप्रेरक पाइनल ग्रंथीमधून बाहेर पडते जे झोपी जाण्यास मदत करते. म्हणून, रात्रीच्या वेळी झोपेच्या एक तास मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा.

पुस्तके वाचा

पुस्तक वाचणे ही एक चांगली सवय आहे आणि हा एक चांगला पर्याय आहे. पुस्तक वाचून तुमचे मन शांत होते. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे आवडते पुस्तक वाचू शकता.

दूध किंवा चहा

चांगल्या झोपेसाठी काही गरम गोष्टी पिणे फायदेशीर आहे. तुम्ही हळदीचे दूध किंवा कॅमोमाइल चहा पिऊ शकता. हा चहा तुमच्या मेंदूसाठी तसेच आतड्यांसाठी फायदेशीर आहे.

झोपण्यापूर्वी आंघोळ करा
तज्ञांच्या मते, शॉवर घेणे हा चांगला झोपेचा पर्याय असू शकतो. हे आपली झोप सुधारते आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.

ब्रीदिंग एक्सरसाइज

तुम्हाला हे वाचायला विचित्र वाटेल, पण तुम्ही झोपण्यापूर्वी ब्रीदिंग एक्सरसाइज केल्या पाहिजेत. योग तज्ञ, आध्यात्मिक गुरू झोपेच्या आधी ब्रीदिंग एक्सरसाइज करण्याच्या शिफारस करतात. त्याचे कारण म्हणजे झोपण्यापूर्वी प्राणायाम केल्याने मन शांत होते आणि झोपही चांगली येते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips to get a good night’s sleep)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI