AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेंग्यूतून बरे होताना शरीर होते कमजोर, चिंता नको, या उपायांनी व्हाल पुन्हा तंदुरुस्त

डेंग्यू तापातून बरे झाल्यानंतरही अशक्तपणा कायम राहतो. त्यामुळे डेंग्यूतून बरे होताना आपल्या आहारकडे चांगले लक्ष्य द्यायला हवे. डेंग्यूमुळे दरवर्षी 25 हजार लोकांचा मृत्यू होतो त्यापैकी 70 टक्के रुग्ण आशियातील असतात.

डेंग्यूतून बरे होताना शरीर होते कमजोर, चिंता नको, या उपायांनी व्हाल पुन्हा तंदुरुस्त
dengue recovery foodImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 01, 2024 | 7:09 PM
Share

Dengue Recovery Tips : पावसाळ्यात डासांच्या पासून उपद्रव वाढत असल्याने मलेरिया, डेंग्यू किंवा डेंगी ( चिकनगुनिया ) आणि इतर डासांपासूनच्या आजारांचे प्रमाण वाढत असते. या डेंग्यूच्या तापाला चिकनगुनिया देखील म्हटले जाते. यात शरीर तापाने अक्षरश: वाकत असते. त्यामुळे या आजाराला हाडमोड्या ताप देखील म्हटले जाते इतके आपले सांधे आणि डोके दुखत असते. डासाच्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासांच्या माध्यमातून विषाणूजन्य ताप येत असतो. या आजारावर ॲलोपथीच बेस्ट असते. परंतू आपण आजारातून बरे होताना ॲलोपथीची औषधे सुरु ठेवून आपला आहार विहार बदलल्यास कमजोरीतून लवकर बाहेर पडतो.

डेंग्यू तापाने आलेल्या कमजोरीनंतर काय खावे

1. किवी, ड्रायगन फूड लिंबू वर्गीय फळे खावीत

डेंग्यूच्या ताप उतरल्यानंतर शरीराची इम्यूनिटी पॉवर वाढविण्यासाठी किवी, ड्रॅगन फूड किंवा संत्र्यासारखी लिंबूवर्गीय आंबड फळे खावीत.यात विटामिन सी, एंटी-ऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर असतात. त्यामुळे शरीर अगदम तंदुरुस्त होऊन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते.

2. दूधाचा वापर

डेंग्यूतून जर लवकर बरे व्हायचे असेल आणि तुम्हाला दूध पचत असेल तर रोज गरम दूध प्यायल्याने देखील फायदा होतो. दूधात अनेक पोषक तत्वं असतात. ज्यामुळे शरीर हेल्दी बनते आणि उत्साह वाढतो.

3. लिक्विड डाएटचा वापर

डेंग्यू तापातून रिकव्हर झाल्यानंतर तुम्ही शरीरातील कमजोरी घालविण्यासाठी पातळ अन्नपदार्थांना खाऊ शकता. पाणी आणि् फ्रूट ज्यूस भरपूर प्यावा अर्थात घरच्या घरी ज्यूस गेलेला बरा. डाएटमध्ये ग्लूकोजचे पाणी प्यावे,नारळ पाणी, लिंबू पाणी, सरबत पिणे फायदेशीर असते परंतू स्वच्छता असलेल्या ठिकाणचे सरबत प्यावे त्यात भेसळ नको

4. हिरव्या पालेभाज्या खाव्यात

आपल्या आहारात मोसमी पालेभाज्यांचा अधिक वापर असावा. भाज्याचे सूप देखील करुन पिल्यास फायदा होईल. जास्त तळलेले तेलकट आणि मसालेदार आणि तिखट काही खाऊ नये. कॅफीन आणि हाय कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ उदा. चहा आणि कॉफी तसेच मद्यपान आणि सिगारेट यापासून चार हात लांब राहावे.

5. अंडी खावीत

डेंग्यूच काय तर कोणत्याही आजारात जर पटकण आपल्याला कमजोरी घालवायची असेल तर प्रोटीन गरजेचे असते. अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन- बी, पोटॅशियम असते. ज्यामुळे डेंग्यूनंतर शरीर मजबूत होण्यासाठी मदत होते.

( Disclaimer : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी आपण आपल्यावर उपचार करणारे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )

ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....