AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : ग्लूटेन संवेदनशीलतेचा स्वयंप्रतिकार रोगांवरही होतो परिणाम, नेमकं काय ते जाणून घ्या

संधिवात, ल्युपस किंवा हाशिमोटोचा थायरॉइडायटिस यांसारख्या स्वयंप्रतिकार रोगांचा सामना करणार्‍या व्यक्तींसाठी, ग्लूटेन संवेदनशीलता हा एक गुंतागुंतीचा घटक ठरतो.

Health : ग्लूटेन संवेदनशीलतेचा स्वयंप्रतिकार रोगांवरही होतो परिणाम, नेमकं काय ते जाणून घ्या
Gluten sensitivity,
| Updated on: Dec 14, 2023 | 8:17 PM
Share

मुंबई : गव्हामधील ग्लूटेन प्रोटीन पोटाच्या आतील कोशिकांमध्ये प्रतिकूल क्रिया करत असेल तर त्याला ग्लूटेन सेन्सेटिव्हिटी म्हणतात.या पदार्थांमध्ये असतं ग्लूटेनचा वापर खाद्यपदार्थांना घट्टपणा येण्यासाठी आणि स्टॅबेलाईझ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याचं वर्गीकरण शक्य नाही , पण, साधारणपणे प्रोसेस्ड फूड मध्ये ग्लूटन जास्त असतं. ब्रेड, पिझ्झा, पास्ता, ब्रेडक्रम्स, नूडल्स, व्हेजी बर्गर, पेस्ट्री, कुकीज यात ग्लूटेन असतं. गहू, जव, गव्हाचा रवा, सोया सॉस, बीयर, फ्लेवर्ड चिप्स, काही सॅलड ड्रेसिंग, काही मिक्स मसाले. काही प्रकारच्या वाईन मध्येही ग्लूटेन असतं. याबाबत डॉ प्रदीप महाजन यांनी सविस्तरपणे सांगितंल आहे.

सीलीएक, व्हीट एलर्जी,इरीटेबल बाऊल सिंड्रोम असे त्रास असतील तार ग्लूटेनयुक्त पदार्थ खाऊ नयेत. जरी कोणताही आजार किंवा त्रास नसेल तरीही ग्लूटेन असलेले पदार्थ कमी खावेत किंवा या पदार्थांबरोबर फायबर, न्‍यूट्रिशनयुक्त पदार्थही घ्यावेत.

रिजनरेटिव्ह मेडिसिन स्वयंप्रतिकार रोगांच्या क्षेत्रात एक आशादायक उपचार पध्दती म्हणून उदयास आले आहे, जे केवळ संभाव्य उपचार म्हणूनच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. केवळ लक्षणे व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार्‍या पारंपारिक पध्दतींच्या विपरीत, रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उद्दिष्ट हे स्वयंप्रतिकार स्थितीच्या मूळ कारणं शोधून त्यानुसार उपचार करणे आहे, ज्यामध्ये ग्लूटेन संवेदनशीलता आणि लीकी गट सिंड्रोमचा समावेश आहे.

रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या मुख्य पैलूंपैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याची क्षमता. अत्याधुनिक थेरपींने स्वयंप्रतिकार रोगांमध्‍ये दिसणार्‍या अतिक्रियाशील प्रतिसादांना कमी करते. ग्लूटेन संवेदनशीलता, लीकी गट सिंड्रोम आणि ऑटोइम्यून रोग यांच्यातील गुंतागुंत रोखण्यासाठी रिजनरेटिव्ह मेडिसिनचा वापर करणे योग्य राहिल.

ग्लूटेन संवेदनशीलतेमुळे होणारी संभाव्य हानी ओळखणे आणि बाऊल सिंड्रोमशी त्याचा संबंध ओळखणे हे वैद्यकिय आणि स्वयंप्रतिकार परिस्थितीच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आहे. संशोधन जसजसे पुढे सरकत जाते, तसतसे रिजनरेटिव्ह मेडिसिन आशेचा किरण ठरत आहे. रिजनरेटिव्ह मेडिसिन हे स्वयंप्रतिकार रोगांच्या क्षेत्रातील ग्लूटेन संवेदनशीलतेने त्रासलेल्या लोकांसाठी जीवनाचा दर्जा सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.