गुडनाईट जम्बो फास्ट कार्ड : डासांपासून 4 तासांपर्यंत संरक्षण, प्रत्येक वापरासाठी खर्च फक्त दीड रुपया

भारताची महामारीविरोधातील लढाई सुरु असतानाच मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या केसेसमुळे आरोग्याला दुहेरी धोका निर्माण झाला आहे. या समस्येचा उहापोह होण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा विषय 'डासजन्य आजारांविरोधातील लढा आणि नावीन्यपूर्णतेची गरज' (द फाईट अगेन्स्ट मॉस्किटो-बॉर्न डिसिजेस अँड द नीड फॉर इनोव्हेशन) हा होता आणि या चर्चासत्रामध्ये भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय; इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर); द गेट्स फाउंडेशन; होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (हिका) आणि गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स मधील तज्ञ सहभागी झाले होते.

गुडनाईट जम्बो फास्ट कार्ड : डासांपासून 4 तासांपर्यंत संरक्षण, प्रत्येक वापरासाठी खर्च फक्त दीड रुपया
good night jumbo fast card
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 11:36 AM

मुंबई : भारताची महामारीविरोधातील लढाई सुरु असतानाच मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या केसेसमुळे आरोग्याला दुहेरी धोका निर्माण झाला आहे. या समस्येचा उहापोह होण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा विषय ‘डासजन्य आजारांविरोधातील लढा आणि नावीन्यपूर्णतेची गरज’ (द फाईट अगेन्स्ट मॉस्किटो-बॉर्न डिसिजेस अँड द नीड फॉर इनोव्हेशन) हा होता आणि या चर्चासत्रामध्ये भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय; इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर); द गेट्स फाउंडेशन; होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (हिका) आणि गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स मधील तज्ञ सहभागी झाले होते.

या चर्चेदरम्यान एक परिवर्तनकारी, नाविन्यपूर्ण उत्पादन सादर करण्यात आले ज्यामुळे शहरातील तसेच गावांमधील लोकांना डासांपासून संरक्षण मिळवणे सहजशक्य, प्रभावी आणि परवडण्याजोगे बनू शकते. गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्समधील संशोधन आणि विकास टीमने तयार केलेले, कागदापासून बनवलेले हे डास प्रतिबंधक डासांपासून त्वरित मुक्ती आणि 4 तासांपर्यंत संरक्षण मिळवून देते.

या उत्पादनाचे नाव गुडनाईट जम्बो फास्ट कार्ड असे असून हे एक चक्राकार कागदी कार्ड आहे. जम्बो फास्ट कार्ड जळवताच त्यातील तंत्रज्ञान सक्रिय होऊन वेगाने कृती करू लागते आणि डासांना त्वरित मारते. इतकेच नव्हे तर याचा एक छान सुगंध संपूर्ण खोलीभर दरवळत राहतो.

भारतात वापरली जाणारी जवळपास 50% डास प्रतिबंधके ही जळवून वापरण्याची आहेत. यापैकी जवळपास 30% डास प्रतिबंधकांमध्ये मान्यता नसलेल्या आणि बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्या वापरलेल्या असतात, या उत्पादनांमधील ऍक्टिव्ज म्हणून हानिकारक रसायनांचा वापर केलेला असल्याने आरोग्यावर त्यांचे विपरीत परिणाम होतात. जम्बो फास्ट कार्ड उच्च दर्जाचे असून हानिकारक प्रतिबंधके वापरणाऱ्यांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे.

या क्रांतिकारी उत्पादनाचा वापर करण्यासाठी विजेवर अवलंबून राहावे लागत नाही त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये ते वापरणे अतिशय व्यवहार्य ठरू शकते. गुडनाईट जम्बो फास्ट कार्ड 10 कार्ड्सच्या पॅकमध्ये उपलब्ध असून याची किंमत सहज परवडण्याजोगी म्हणजे फक्त 15 रुपये आहे. याचाच अर्थ असा की प्रत्येक वापरासाठी फक्त दीड रुपया खर्च करावा लागतो.

या अभिनव उत्पादनाबद्दल गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत आणि सार्क देशांचे सीईओ सुनील कटारिया यांनी सांगितले, “घरगुती वापराच्या कीटकनाशकांच्या विभागात नेतृत्वस्थानी असलेला ब्रँड या नात्याने गुडनाईट सातत्याने नवनवीन संशोधन करून प्रभावी, सुरक्षित उपाय अतिशय माफक किमतीमध्ये उपलब्ध करवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. जम्बो फास्ट कार्ड हे आमचे सर्वात नवीन उत्पादन असून या विभागाचे सखोल ज्ञान आणि सध्या देशाच्या नेमक्या गरजा काय आहेत याची जाण आम्हाला असल्याचा हा परिणाम आहे. कागदापासून बनवलेले हे क्रांतिकारी उत्पादन ग्राहकांना दुहेरी लाभ मिळवून देते कारण याची कृती त्वरित सुरु होते आणि 10 कार्डांसाठी फक्त 15 रुपये इतक्या कमी किमतीत त्याचा प्रभाव 4 तासांपर्यंत टिकतो. म्हणूनच शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील लोकांसाठी जम्बो फास्ट कार्ड हे डासांच्या विरोधात एक प्रभावी आणि परवडण्याजोगे अस्त्र ठरेल.”

जर भारताला डासजन्य आजारांपासून मुक्त व्हायचे असेल तर नावीन्यपूर्णता आणि भागीदारी यांची गरज असल्याची सूचना वेलबीइंग चॅम्पियन डॉ. मार्कस रॅने यांच्या द्वारे संचालित आणि आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, द गेट्स फाउंडेशन, हिका मधील तज्ञांचा समावेश असलेल्या पॅनेलने मांडली आहे. कोविड-19 ही प्रचंड मोठी जागतिक आरोग्य समस्या असली तरी सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात नावीन्यपूर्णतेने अगदी थोड्या कालावधीत किती महत्त्वाची भूमिका बजावली याचे ते खूप मोठे उदाहरण आहे. होम टेस्टींग कोविड-19 किट्स, इन्फेक्शन फ्री टॅप्स, फोन बूथ कोविड-19 टेस्टींग इथपासून ते थेट अगदी कोविडवरील लसीपर्यंत, या सर्व अभिनव उपायांनी जगभरातील लोकांना महामारीविरोधात लढण्यासाठी सक्षम केले. सामूहिक दृष्टिकोन अवलंबिला जावा आणि मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार दूर करण्यासाठी नवनवीन उत्पादने शोधली जावीत अशी देखील सूचना या पॅनेलने केली आहे.

मलेरिया आणि डेंग्यूचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या सवयी आणि मानसिकतेमध्ये बदल घडून आले पाहिजेत असे आवाहन या तज्ञांनी केले आहे. स्वच्छतेच्या योग्य सवयी स्वीकारून, घरी डास प्रतिबंधके आणि घराबाहेर पडताना व्यक्तिगत डास प्रतिबंधके वापरून, बिछान्यावरील जाळी, संपूर्ण शरीर झाकतील असे कपडे वापरून, घरात आणि घराच्या आजूबाजूला पाणी साठून राहणार नाही व त्यामध्ये डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेऊन व्यक्तिगत पातळीवर बदल घडवून आणले जाणे अनिवार्य आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार डॉ. पीके सेन यांनी सांगितले, “डासजन्य आजारांपासून मुक्त व्हायचे असेल तर भारताला नावीन्यपूर्णतेची गरज आहे. मलेरिया आणि डेंग्यू या हंगामी उद्भवणाऱ्या आजारांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होतो. अर्थव्यवस्था आणि आरोग्य यंत्रणेवर या आजारांचे ओझे खूप मोठे आहे. संपूर्ण जगभरातील आरोग्य व्यवस्थेवर कोविड-19 महामारीने प्रचंड दबाव निर्माण केलेला आहे. प्रभावी सदिश नियंत्रण प्रतिसादासाठी समुदायाचे एकत्रीकरण मजबूत करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन एककेंद्राभिमुखतेसह एकत्रित प्रयत्न ही गुरुकिल्ली आहे. नावीन्यपूर्णतेला पाठिंबा दिला गेल्याने अनोखी उपकरणे विकसित होतील आणि भागीदारीला प्रोत्साहन देणारी इको-सिस्टिम निर्माण होईल. अधिक नवीन उपकरणांसह धोरणे राबवल्यास सहजप्राप्य, परवडण्याजोग्या आणि शाश्वत आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजला गती मिळेल.”

आयसीएमआर – रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर, गोरखपूरच्या संचालिका डॉ. रजनी कांत यांनी सांगितले, “आपल्याला औषध प्रतिरोधासारख्या, प्राथमिकता देणे आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याची, मलेरियाच्या केसेस सर्वाधिक असणारी ठिकाणे जाणून घेण्याची आणि याच्या उच्चाटनासाठी काही मॉडेल प्रकल्प प्रदर्शित करण्याबरोबरीनेच डेंग्यू रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची व लस संशोधनाच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, संपूर्ण जगभरात प्रवास आणि हवामानातील बदल यामुळे डासजन्य आजारांचा सामना करण्यासाठी स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम बनवण्याची गरज आहे. विश्लेषण आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तयार होण्यात मदत करेल. सार्वजनिक क्षेत्रातील असो किंवा खाजगी, प्रत्येक नावीन्यपूर्णतेला पाठिंबा दिल्याने भारत प्रतिबंधासाठी उपाय आणि उपकरणे व आजार उद्भवल्यानंतर अधिक चांगले उपचार देण्यात समर्थ बनेल. आपली 95% लोकसंख्या मलेरियाग्रस्त भागात राहते, सार्वजनिक-खाजगी भागीदारी देखील जनतेसाठी परवडण्याजोगे, प्रभावी उपाय विकसित करण्यात आणि संशोधन करण्यात मदत करू शकते.”

घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित उपयोगाबाबत जागरूकता वाढवण्याचे काम करणारी विनानफा तत्त्वावर काम करणारी उद्योगक्षेत्रातील संघटना होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशनचे मानद सचिव ऍडव्होकेट जयंत देशपांडे यांनी सांगितले, “मलेरिया आणि डेंग्यूविरोधात स्वतःला सज्ज करताना लोकांनी योग्य घरगुती कीटकनाशकांचा उपयोग करणे आवश्यक आहे. सध्या आम्ही लोकांना बेकायदेशीर मच्छर अगरबत्त्या वापरणे थांबवून नामांकित कंपन्यांच्या सुरक्षित व मान्यताप्राप्त अगरबत्त्या वापरण्याचे आवाहन करत आहोत. बेईमान कंपन्यांच्या अगरबत्त्या स्वस्त असू शकतील पण या कंपन्या उत्पादन प्रक्रियांमध्ये नियमांचे पालन करत नाहीत, सर्व घरगुती कीटकनाशक उत्पादनांसाठी आखून देण्यात आलेले त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेविषयीचे सुरक्षा निकष तपासत नाहीत. सर्व बेकायदेशीर अगरबत्त्या नियमांचे उल्लंघन करतात आणि वर नमूद करण्यात आलेल्या निकषांनुसार त्यांची तपासणी झालेली नसते. गुडनाईट जम्बो फास्ट कार्डसारखी परवडण्याजोगी आणि प्रभावी नाविन्यपूर्ण उत्पादने क्रांतिकारी ठरतील आणि ग्राहकांना त्यातून लाभ मिळेल.”

गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे श्री. सुनील कटारिया यांनी सांगितले, “एक उद्योगसमूह या नात्याने गोदरेजने नेहमीच लोकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले आहेत. गुडनाईट जम्बो फास्ट कार्ड हे आमच्या संशोधन व विकास टीमने तयार केलेल्या व्यावहारिक उपायांपैकी एक आहे. डासजन्य आजारांच्या विरोधातील लढ्यामध्ये भारताचे हात अधिक बळकट व्हावेत यासाठी हे आमचे एक योगदान आहे.”

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे थैमान; महिन्यापासून डेंग्यूचाही उद्रेक, स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

आता डेंग्यूचाही वेगळा व्हेरिएंट, औरंगबाादेत रुग्णसंख्येत अचानक वाढ, ताप अंगावर काढू नका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.