AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून 30 जीवनावश्यक औषधांच्या किंमती निश्चित; MRP पेक्षा जास्त आकारता येणार नाही पैसे

केंद्र सरकार आणि NPPA नं डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हृदयविकारांवरील 30 अत्यावश्यक औषधांसाठी एमआरपी निश्चित केली आहे. त्यामुळे दुकानदार आता रुग्णांकडून निश्चित केलेल्या या किमतीपेक्षा एक रुपयाही जास्त आकारू शकणार नाहीत.

सरकारकडून 30 जीवनावश्यक औषधांच्या किंमती निश्चित; MRP पेक्षा जास्त आकारता येणार नाही पैसे
संग्रहित छायाचित्रImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2026 | 1:59 PM
Share

सरकारने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांच्यासाठी दररोज किंवा दीर्घ काळासाठी घ्याव्या लागणाऱ्या 30 अत्यावश्यक औषधांच्या एमआरपी (MRP) निश्चित केल्या आहेत. म्हणजेच आता कोणतीही फार्मसी या औषधांसाठी निर्धारित एमआरपीपेक्षा एक रुपयासुद्धा जास्त आकारू शकणार नाही. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) 27 मे 2026 पासून लागू होणारा हा आदेश जारी केला आहे. भारतातील औषधांच्या किमतींबद्दलची सर्वांत मोठी तक्रार हीच आहे की एकच औषध वेगवेगळ्या ब्रँड्सच्या नावांनी आणि खूप वेगवेगळ्या किमतींना विकलं जातं. एका मेडिकलमध्ये 15 रुपयांना मिळणारं औषध दुसऱ्या मेडिकलमध्ये 40 रुपयांना मिळू शकतं. त्यामुळे औषधांची योग्य किंमतच रुग्णांना किंवा ग्राहकांना माहीत नसते. शिवाय डॉक्टरांनी सांगितलेला ब्रँडच ते खरेदी करण्यास भाग पडतात. इतकंच नाही तर कंपन्या नवीन औषधं किंवा ज्यांच्या किमती सरकारने अद्याप निश्चित केलेल्या नाहीत, अशी औषधं त्यांना हव्या त्या किमतीला विकू शकतात. यामुळेच मधुमेह किंवा हृदयरोगसारख्या आजारांवरील औषधांचा मासिक खर्च हजारो रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

एनपीपीएच्या आदेशानंतर, सरकारने या 30 औषधांची एमआरपी निश्चित केली आहे. आता कोणतीही कंपनी किंवा मेडिकल असलं तरी कोणीही या औषधांसाठी निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दर आकारू शकणार नाही. जो कोणी दुकानदार जास्त दर आकारेल, तो कायद्याचं उल्लंघन करत असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कोणत्या आजारासाठी कोणतं औषध कितीला मिळेल?

  • मधुमेह रुग्णांसाठी असलेली विल्डाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिनची कॉम्बो टॅब्लेट आता 9.79 रुपये प्रति टॅब्लेटपेक्षा जास्त दराने विकली जाणार नाही.
  • हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी बिसोप्रोलोल आणि अ‍ॅम्लोडिपिनच्या कॉम्बोची किंमत 7.31 ते 9.40 रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आली आहे.
  • सिटाग्लिप्टिन, ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिनची किंमत 10.39 रुपये ते 11.91 रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आली आहे. टेनेलिग्लिप्टिन आणि डॅपाग्लिफ्लोझिनच्या कॉम्बो टॅब्लेटची किंमत 10.17 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही औषधं दररोज घ्यावी लागत असल्याने, महिन्याला 30 गोळ्यांच्या हिशोबाने निश्चित केलेली किंमत 300 ते 360 रुपयांपेक्षा जास्त होणार नाही.
  • हाडांसाठी असलेल्या व्हिटॅमिन डी 3 ओरल सोल्युशनची किंमत 14.91 ते 15.88 रुपये प्रति मिली आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, मिथाइलकोबालामिन आणि एल-मिथाइलफोलेट कॅल्शियम असलेल्या संयुक्त टॅब्लेटची किंमत 19.78 रुपये आहे.
  • किडनी किंवा यकृत प्रत्यारोपणानंतर दिल्या जाणाऱ्या टॅक्रोलिमस प्रोलॉन्गड रिलीज कॅप्सूलची एमआरपी प्रति कॅप्सूल 127 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे अत्यंत महागडं औषध मानलं जातं. आता त्याची किंमत निश्चित झाल्याने प्रत्यारोपण रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • सिल्निडिपिन आणि टेल्मिसार्टनच्या गोळ्यांची किंमत 12.98 ते 14.95 रुपये आहे. कोलेस्ट्रॉलवरील औषध ॲटोरवास्टॅटिन आणि फेनोफायब्रेटची किंमत 18.46 रुपये प्रति टॅब्लेट आहे.
  • ऍलर्जी आणि दम्यासाठीच्या बिलास्टीन आणि मॉन्टेलुकास्ट गोळ्यांची किंमत 21.22 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ताप आणि वेदनांसाठीच्या पॅरासिटामॉल, फेनिलेफ्राइन आणि क्लोरफेनिरामाइन गोळ्यांची किंमत फक्त 5.15 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

औषध खरेदी करताना त्यावर लिहिलेली एमआरपी आवर्जून तपासा. जर दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमत मागत असेल तर तुम्ही नकार देऊ शकता. याविरोधात जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही एनपीपीएच्या nppa.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा राज्य औषध नियंत्रक कार्यालयात तक्रार दाखल करू शकता.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा