Pregnency Tips | गर्भवतीने आनंदी राहिल्यावर काय होतो फायदा…जाणून घ्या एका क्लिकवर

Pregnency Tips | गर्भवतीने आनंदी राहिल्यावर काय होतो फायदा...जाणून घ्या एका क्लिकवर
सांकेतिक फोटो

Health Tips मातृत्व हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खूप खास आणि सुंदर क्षण असतो. या 9 महिन्यात महिलेमध्ये शारिरीक आणि मानसिक बदल होत असतात. दैनंदिन आयुष्यातही अनेक बदल होत असतात. यासगळ्यासोबत जात असताना तिची चिडचिड होत असते. अशावेळी आनंदी राहा असं म्हटलं तर तिचा अधिक मनस्ताप होतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 23, 2022 | 1:05 PM

मुंबई : आनंदी राहा (Happy)असं कुठल्या गर्भवती (Pregnency) महिलेला म्हटलं तर पहिले ती आपल्याला मुर्खात काढेल. कारण ती गर्भवती झाल्यावर तिच्या आयुष्यात अनेक बदल झाले असतात. त्याबदलासोबत तिला पुढे जायचं असतं. अशात तिची चिडचिड होत असते. अनेक गोष्टी पहिलेसारख्या नसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आनंदी राहिल्यामुळे बाळ आणि तुम्हाला फायदा होतो. तर जाणून घेऊयात काय फायदे आहेत.

आनंदी राहा, निरोगी बाळा द्या जन्म

1. तणाव मुक्त

गर्भवती असताना तुमच्यामध्ये हार्मोन्स बदलत होतात त्यामुळे तुमचे सतत मूड स्विंग्स होतात. आणि त्यामुळे तुला क्षणात राग येतो. तुम्ही तणावात असतात तर कधी कधी काही महिला या डिप्रेशनमध्येही जातात. त्यामुळे अशावेळी तुम्ही आनंदी राहिल्यात तर तुमच्या शरीरात आनंद निर्माण करणारे हार्मोन्स तयार होतात. आणि याचा फायदा तुम्ही तणाव मुक्त राहता.

2. बीपीवर राहणार नियंत्रण

गर्भवस्थेत असताना अनेक महिलांना बीपीचा त्रास होतो. बीपीच्या समस्येमुळे काही महिलांचे गर्भपात होतं. त्यामुळे जर तुम्ही आनंदी राहिल्यामुळे बीपी नियंत्रणात राहतो. आणि बीपीमुळे होणारे अनेक धोके आपल्याला टाळता येतात.

3. आनंदी राहा आणि हेल्दी राहा

गर्भवस्थेत महिलांना कंबरदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे आणि सतत थकवा या समस्यातून जावं लागतं. तुम्ही आनंदी राहिल्या तर शरीरात एक प्रकारची एनर्जी निर्माण होते. ज्यामुळे या सारखा समस्याकडे तुमचं लक्ष जात नाही. आणि तुम्ही नार्मल डिलिव्हरीसाठी तयार होता.

4. निरोगी बाळ

तुम्ही आनंदी राहिल्यामुळे गर्भातील बाळाला तुम्ही खात असलेल्या आहारातून पोषण मिळतं. यातून बाळाचा चांगला विकास होतो. आई जे करते ते गर्भातील बाळापर्यंत पोहोचतं. त्यामुळे या दिवसांमध्ये आईला चांगली कामं करायला सांगितात. चांगलं खायला सांगतात जेणे करुन बाळाचा चांगला विकास होईल.

आनंद निरोगी बाळसाठी मूलमंत्र

गर्भवती महिला आनंदी ठेवण्याची सगळ्या महत्त्वाची जबाबदारी तिच्या नवऱ्याची असते. नंतर कुटुंबातील इतर सदस्यांनीही ती कशी खूश राहिल याची काळजी घ्यायची असते. गर्भवती महिने स्वत: ज्या गोष्टीत तिला आनंद मिळतो त्या गोष्टी आवर्जून कराव्यात. पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, छंद जोपासणे, कॉमिडी पिक्चर अथवा सिरीयल पाहणे. अगदी तुम्हाला जात आनंद मिळतो ते करा. सोबत योगसाधना करुन मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यास मदत होते.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा इतर बातम्या :

Health Tips | मुलांची स्मरणशक्ती वाढवायचीय, जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचा करावा समावेश!

Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्यूदर अत्यंत कमी, तिन्ही लाटेत फरक काय?

मेड इन चायना लसीचा फुसका बार, खोटे आकडे दाखवणं चीनला महागात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें