आज जरा जास्तच तेलकट झालं? ‘या’ 6 पध्दतीने मिळवा आराम

काही कारणास्तव अनेक वेळा तेलकट पदार्थांचे अतिरिक्त सेवन केले जाते. सणांनिमित्त, लग्नसोहळ्यात असे प्रसंग अनेकदा घडतात. परंतु ते खाल्ल्यानंतर मात्र हे जरा जास्तच झाल्याची भावनाही आपल्यात निर्माण होत असते. जंक फूड, जास्त तळलेले पदार्थांचे अतिसेवन शरीरासाठी हानीकारक असते. ते शक्यतो टाळलेच पाहिजे.

आज जरा जास्तच तेलकट झालं? 'या' 6 पध्दतीने मिळवा आराम
Oily Food
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 12:38 PM

मुंबई : आपल्याला नेहमी कमी तेलकट अन्नघटक खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो. अनेक जण आपल्या डाएटमधून तेलकट घटकांना बगल देत असतात. परंतु काहीतरी कारणांमुळे इच्छा नसूनही आपण खूप तेलकट पदार्थ (Oily Food) खातो आणि त्यानंतर आपण हे खायला नको होते, याचा पश्चातापदेखील आपणास होत असतो. जंक फूड, जास्त तळलेले पदार्थांचे अतिसेवन (Overdose) शरीराला अत्यंत अपायकारक ठरत असते. यातून लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्रदयाशी संबंधित अनेक आजार निर्माण होत असतात. त्यामुळे असे अन्नघटक मोजून मापूनच खाणे योग्य असते. परंतु अनेकदा कार्यक्रम, लग्न समारंभात तेलकट पदार्थ खाल्ले जाते. याचे अतिसेवन झाल्यास तुम्हाला पोटदुखी, सूज येणे आणि त्वचेवर पुरळ येणे, छातीत जळजळ होणे आदी विविध दुष्परिणाम (Side effects) दिसून येत असतात.

हे उपाय करा

  1. कोमट पाणी प्या : कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते. हे पचण्यासारखे पोषक तत्व लवकर पचवण्यास मदत करते त्याचप्रमाणे पोटाशी संबंधित सर्व समस्या यातून दूर होण्यास मदत होत असते.
  2. भाज्या आणि फळे खा : ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. अशा परिस्थितीत फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल. ते शरीरातील जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजांची कमतरता पूर्ण करतात. सकाळच्या नाश्त्यात बिया असलेले फळ खा. जेवणाची सुरुवात सॅलडच्या वाटीने करा. जेवणात जंक फूड खाणे टाळावे. सकाळी निरोगी आणि पौष्टिक नाश्ता घ्या. आहारात भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. स्वतःला हायड्रेटेड ठेवा.
  3. डिटॉक्स ड्रिंक : तेलकट काहीही खाल्ल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक घ्या, यातून शरीराला फायदा होईल आणि विषारी पदार्थ बाहेर पडतील. लिंबूपाणी प्या. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल.
  4. प्रोबायोटिक्स फूड : प्रोबायोटिक्स फूड नियमित घ्या. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एक वाटी दही खाल्ल्याने खूप आराम मिळतो. दुसरीकडे, खूप तळलेले अन्न खाल्ल्यानंतर थंड गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे यकृत आणि आतड्यांचे नुकसान होउ शकते. तेलकट अन्न पचवणे कठीण असते.
  5. फिरायला जा : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला गेले पाहिजे. चालण्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.
  6. चांगली झोप घ्या : चांगली झोप तुमचा मूड दिर्घकाळ चांगला ठेवण्यास मदत करते. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर शक्य तितकी विश्रांती घ्या. रात्रीचे जेवण आणि झोप यात नेहमी 2-3 तासांचे अंतर असावे. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न पचण्यास त्रास होतो. त्यामुळे चरबी जमा होण्याची शक्यता वाढते.

इतर बातम्या

World Sleep Day : अपुरी झोप देते अनेक आजारांना निमंत्रण, मानसिक तणावही वाढतो

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडुलिंब आणि हळद एकत्र मिक्स करून खा! जाणून घ्या फायदे

कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.