AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे

स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले असतात, जे केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. हिरवी वेलची ही त्यापैकीच एक आहे. ती आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे आणि ती कधी खावी? याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया

आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
वेलचीचे फायदे
| Edited By: | Updated on: Jun 06, 2025 | 2:58 PM
Share

वेलची ही आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील महत्वाचा मसाला असून त्यांचा उपयोग चव वाढवण्यासाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी केला जातो. आपल्यापैकी अनेकांना वेलचीचा सुगंध आणि चव खूप आवडत असतो. चहा, मिठाई, भात आणि इतर अनेक पदार्थ बनवताना वेलचीचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होत असतो. परंतु त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे खूप कमी लोकांना माहीत असतात. तर आजच्या लेखात आपण वेलचीचे आरोग्यदायी फायदे तसेच वेलची कधी आणि किती प्रमाणात खावे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

हिरवी वेलची थंडावा देणारी असते. यासोबतच त्यात व्हिटॅमिन ई, बी3 आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे वेलचीचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित काही समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वेलची उपयुक्त आहे.

-यावेळी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगरा यांनी सांगितले की, जर हिरवी वेलची दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने तुमचे मन आनंदी राहण्यास मदत होते. यामुळे लाळेला निरोगी बॅक्टेरिया मिळतात, जे रसासह शरीरात प्रवेश करतात. यामुळे दात स्वच्छ राहण्यास देखील मदत होऊ शकते.

– दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलची चावून खाल्ली तर ते लाळ ग्रंथींना सक्रिय करते आणि तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

– यासोबतच हिरवी वेलची माउथ फ्रेशनर म्हणून देखील खाऊ शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे.

-दररोज वेलची खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.

– तसेच वेलचीचे सेवन करताना तुम्ही 3 ते 4 हिरव्या वेलची सकाळी रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता. परंतु तुमच्या शरीराच्या गरजेनुसार आणि वैद्यकीय स्थितीनुसार तज्ञांशी बोलल्यानंतर ते नियमितपणे सेवन करा.

-वेलची अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असल्याने तुम्ही नियमित वेलचीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

– तुम्ही जर दररोज वेलची सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर केस मजबूत आणि चमकदार बनवतात.

-त्याचबरोबर वेलची मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हे गुणधर्म तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....