AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : सकाळची ‘ही’ एक सवय बदला, तुमच्या आरोग्यावर होतील सकारात्मक परिणाम

जर तुम्ही चहा प्रेमी असाल आणि तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला आवडत असाल तर ही बातमी केवळ तुमच्याचसाठी आहे.

Health Tips : सकाळची 'ही' एक सवय बदला, तुमच्या आरोग्यावर होतील सकारात्मक परिणाम
'ही' एक गोष्ट टाळा, आरोग्य सांभाळा!
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 06, 2022 | 6:25 PM
Share

मुंबई : सध्या बरेच लोक अॅसिडिटी (Acidity) आणि पोटातील गॅसच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. आपल्याला जरी ही तितकीशी गंभीर समस्या वाटत नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. कठीण समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आजकाजच्या जीवनशैलीमुळे आणि खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते. आपली रोजच्या दैनंदिनीतली एक समस्या आपल्या अॅसि़डिटीचं कारण ठरू शकते शिवाय यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणं (Health Tips) गरजेचं आहे.

ही सवय बदलाच!

जर तुम्ही चहा प्रेमी असाल आणि तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला आवडत असाल तर ही बातमी केवळ तुमच्याचसाठी आहे. त्वरित तुमची ही सवय बदला. रिकाम्या पोटी चहा पिल्यास अॅसिडिटीचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मळमळणे, छातीत कळ येणे असे प्रकार उद्भवू शकतात. त्यामुळे ही सवय लवकरात लवकर बदला…

फक्त चहाच नाही तर मसालेदार पदार्थ, गरम कॉफी, तेलकट पदार्थ, चॉकलेट इ. या गोष्टी टाळणंही गरजेचं आहे. जर तुम्हाला सकाळी चहाशिवाय राहावत नसेल तर तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता. त्यामुळे अॅसिडिटी होण्याची शक्यता कमी असते.

या गोष्टी आवश्य करा!

सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करा. त्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि पचनक्रियाही चांगली राहाते. शिवाय उकडलेली अंडी खाल्ल्यास पोटाचा त्रास होत नाही आणि हे आरोग्यासाठीही चांगलं असतं. हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करा. त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. शिवाय जेवल्यानंतर फिरायला जा, त्यामुळे अॅसिडिटीचा धोका कमी होतो.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात